शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

काश्मीरमध्ये भारतावर प्रेम करणारा वर्ग मोठा- हंसराज अहिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 16:47 IST

यवतमाळ : जम्मू-काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. आपल्या सुरक्षा यंत्रणा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये दहशतवाद्यांशी लढा देत आहे. सैन्याचे अधिकारी तसेच स्थानिक पोलिसांचे यात मोठे योगदान आहे. स्थानिक पोलिसांमध्ये जास्तीत जास्त जवान मुस्लीम समाजाचे आहेत.

यवतमाळ : जम्मू-काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. आपल्या सुरक्षा यंत्रणा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये दहशतवाद्यांशी लढा देत आहे. सैन्याचे अधिकारी तसेच स्थानिक पोलिसांचे यात मोठे योगदान आहे. स्थानिक पोलिसांमध्ये जास्तीत जास्त जवान मुस्लीम समाजाचे आहेत. आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांच्या देशभक्तीला सलामच केला पाहिजे. एवढेच नाही तर काश्मीरमध्ये भारतावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.यवतमाळ येथील वृत्तवाहिनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे उपस्थित होते. गत काही महिन्यांपासून काश्मीरमध्ये दगडफेक कमी झाली आहे, असे सांगून गृहराज्यमंत्री अहिर म्हणाले, दहशतवादी किंवा त्यांचे समर्थक जुन्या चित्रफिती दाखवून स्थानिकांना भडकाविण्याचे प्रयत्न करीत असतात. प्रसारमाध्यमांतून ब-याचदा काश्मीरबाबत जे दाखविले जाते ते पूर्ण सत्य असेलच असे नाही. कधी कधी अतिरंजित दाखविण्याचा प्रयत्न होतो. काश्मीरच्या सकारात्मक बाबी कमी प्रक्षेपित होतात. आता काश्मीर बदलत आहे. केंद्र सरकार, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, स्थानिक सरकार, स्थानिक पोलीस यांचा समन्वय चांगला आहे. काश्मीरमधील 4 हजार 500 मुस्लीम स्त्रिया भारत सरकारच्या कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेत आहेत, या बाबी जनतेसमोर आल्या पाहिजेत. गत काही वर्षांत घुसखोरी कमी झाली आहे, हे सरकारचे यश आहे.नक्षलवाद्यांनासुद्धा आपण चोख उत्तर देत आहोत. नक्षली कारवायांमध्ये 20 ते 25 टक्के घट झाली आहे. या ठिकाणी सरकारची चांगली कामे असल्यामुळे जनतेचे सहकार्य मिळत आहे.राजकारणात, समाजकारणात टीकाटिपणी झाली पाहिजे. पण त्यात राष्ट्रहित महत्त्वाचे आहे. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. उत्तर कोरिया, चीन यापेक्षा आपण वेगळे आहोत. प्रसार माध्यमांचे यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. यवतमाळच्या प्रसारमाध्यमांनी कीटकनाशक फवारणी हा विषय राष्ट्रीय स्तरावर आणला. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. त्यामुळे सरकार आणि लोकप्रतिनिधींनी लगेच उपाययोजना केल्यात. यात महत्वाचे म्हणजे एक्सपर्ट डॉक्टरांचे पथक त्वरित यवतमाळ येथे पाचारण करण्यात आले. त्यामुळे विषबाधित शेतक-यांचा आकडा आपण वाढू दिला नाही. प्रसारमाध्यमांमुळे समाजाला न्याय मिळतो.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरPakistanपाकिस्तान