शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांनो सावधान...! तुम्हाला डमी वेबसाईटद्वारे घातला जाऊ शकतो गंडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 05:00 IST

ऑनलाइन अकाउंट उघडून काही व्यक्ती आपले संकेतस्थळ प्रसिद्ध करीत आहेत. यावर जाहिरात प्रसिद्ध करून सुशिक्षित बेरोजगारांना प्रथम ते पदासाठी काही पैसे खात्यात वळते करायला लावतात. आपला बँक अकाउंट नंबरही मागतात. मुळात नोकरी लागल्यानंतरच या सगळ्या बाबी द्यायच्या असतात. याच ठिकाणी अनेकांची चूक होते. बनवेगिरी करणाऱ्या व्यक्ती बेरोजगारांच्या खिशातून पैसे उकळतात. 

ठळक मुद्देफेसबूक फ्राॅडच्या घटना वाढल्या : स्क्रीनवर दिसणाऱ्या वस्तू संशयाच्या भोवऱ्यात

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. या संधीचा फायदा घेत काही फ्राॅड करणाऱ्या व्यक्ती सायबर क्राईम घडवून आणत आहेत. नामांकित कंपन्यांसारखीच डमी वेबसाइट बनवून सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घालण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी कायम ठेवीत आयुष्यात अनेक संधी आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. तरच अशा फ्राॅड करणाऱ्या व्यक्तींना आळा घालता येईल.ऑनलाइन अकाउंट उघडून काही व्यक्ती आपले संकेतस्थळ प्रसिद्ध करीत आहेत. यावर जाहिरात प्रसिद्ध करून सुशिक्षित बेरोजगारांना प्रथम ते पदासाठी काही पैसे खात्यात वळते करायला लावतात. आपला बँक अकाउंट नंबरही मागतात. मुळात नोकरी लागल्यानंतरच या सगळ्या बाबी द्यायच्या असतात. याच ठिकाणी अनेकांची चूक होते. बनवेगिरी करणाऱ्या व्यक्ती बेरोजगारांच्या खिशातून पैसे उकळतात. 

अशी करा खातरजमा

कुठल्याही नोकरीवर घेताना सुशिक्षित बेरोजगाराकडून प्रोसेसिंग फी जास्तीत जास्त एक हजार रुपये आकारता येते. शासकीय दर यापेक्षाही कमी आहे. यापेक्षा जास्त पैसे मागितले तर संशयाला वाव आहे.नोकरीवर घेताना मुलाखत होण्यापूर्वीच बँक अकाउंट मागितले जात असेल तर चुकूनही ते बँक अकाउंट देऊ नका. सर्व बाबी अंतिम टप्प्यात आल्यानंतरच या बँक अकाउट देता येते.नोकरीवर लावताना कुठलीही सत्यप्रत संबंधित व्यक्तीकडे देऊ नका. त्याची झेराॅक्स देताना त्याखाली कुठल्या कामासाठी झेराॅक्स देत आहे याचा उल्लेख करूनच स्कॅन करून संबंधितांना द्या.

जागरूक व्यक्ती या प्रकाराला रोखतातपोलिसात घडलेला गुन्हा आणि सायबर क्राईममध्ये मोठा फरक आहे. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी फारसे हाती नसते. आपली माहिती तत्काळ मिळाली तरच असे अकाउंट सील करता येते. त्यासाठी जागरूकता गरजेची आहे.   - अमोल पुरी, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर सेल

अशी होऊ शकते फसवणूक

प्रकरण १एका प्रकरणात एका मुलीला नोकरी लावण्यासाठी कंपनीने ऑनलाइन ऑफर दिली. ही प्रक्रिया पार पाडताना संबंधिताच्या खात्यातून एक लाख ८० हजार रुपये वळते झाले. या प्रकरणात संबंधित व्यक्तीने कायदेशीर कारवाईसाठी संपूर्ण प्रकरण वर्ग करण्यात आले.

प्रकरण २४८ हजार रुपयांची गाडी २८ हजार रुपयांमध्ये देण्याची ऑफर फेसबुकवरून आली. या गाडीचे केवळ चित्र पाहून संबंधित व्यक्तीने विक्रेत्याच्या खात्यात पाच हजार रुपये जमा केले. यानंतर डिलिव्हरी मिळेल असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात महिना लोटला तरी गाडी मात्र मिळाली नाही.

प्रकरण ३एका प्रकरणात खात्यामधून पैसे वळते झाल्यानंतर त्या व्यक्तीने सायबर सेलशी संपर्क केला. यानंतर सायबर सेलने पैसे वळते करणाऱ्या गुन्हेगाराच्या खात्याचा शोध घेतला. यावेळी ही रक्कम एका खात्यामध्ये होती. त्या ठिकाणावरून त्यांना परत आणता आली. जागरूकतेने झालेला फ्राॅड वाचला.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम