शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! महामार्गावरील दुभाजक तोडाल तर होई­ल पाच वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2022 22:24 IST

व्यवसाय मार खातो म्हणून दुभाजक तोडण्याचा उद्दामपणा करण्यात आला आहे. यामुळे मोठा धोका निर्माण होतो.  राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची सरासरी गती निर्धारित केली आहे. रस्त्याला वळण न ठेवता तो सरळ केला आहे.  दुभाजकामुळे रस्ता वाहतूक जास्त सुरक्षित होते. सहज कुणालाही टर्न घेता येत नाही. दुभाजक तोडून अपघात प्रवणस्थळच निर्माण केले जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताची चिकित्सा करण्यात आली. रस्ता सरळ व सुटसुटीत असतानाही अपघात का होतात, हा प्रश्न उपस्थित करून चौकशी केली असता तब्बल ३०२ प्राणांकित अपघात झाले. यात ३१८ जणांचा मृत्यू झाला. यावरून राष्ट्रीय महामार्ग ३६१ यावर कळंब ते उमरखेड दरम्यान जिल्हा वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा पोलिस दल यांच्याकडून संयुक्त प्रयत्न करण्यात आले. यात अनेक व्यावसायिकांनी आपल्या सोईसाठी महामार्गावरील दुभाजक तोडल्याचे आढळून आले. अशा विरोधात पोलिसांनी स्वत:हून तक्रार देत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. यात पुढील कारवाई केली जात आहे. पहिल्यांदाच अशी कारवाई झाली. शासकीय संपत्तीचे नुकसान पडेल महागात- भारतीय दंड विधान यातील कलम ४३१ गुन्हा दाखल करून त्यात पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. - याशिवाय सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम यातील कलम ३, ५ नुसार गुन्हा दाखल केला जातो व कारवाई होते. 

जिल्ह्यात दहा महिन्यांत नऊ जणांवर कारवाई पोलिसांनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुभाजक तोडणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. महामार्गावर नऊ ठिकाणी सोयीसाठी दुभाजक तोडल्याचे निदर्शनास आले आहे. यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहे. 

अपघाताची शक्यता वाढते ठरावीक अंतरावरच महामार्गाच्या दुभाजकावर वळण्यासाठी जागा दिलेली आहे. मात्र, व्यावसायिकांनी आपला ढाबा, पेट्रोलपंप याच्यासमोरच दुभाजक तोडल्याने लेन कटिंगचा प्रकार वाढला. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. 

पेट्रोलपंप, हॉटेल चालकांनो सावधानव्यवसाय मार खातो म्हणून दुभाजक तोडण्याचा उद्दामपणा करण्यात आला आहे. यामुळे मोठा धोका निर्माण होतो. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची सरासरी गती निर्धारित केली आहे. रस्त्याला वळण न ठेवता तो सरळ केला आहे. दुभाजकामुळे रस्ता वाहतूक जास्त सुरक्षित होते. सहज कुणालाही टर्न घेता येत नाही. दुभाजक तोडून अपघात प्रवणस्थळच निर्माण केले जात आहे. 

राष्ट्रीय महामार्गावर कळंब ते उमरखेड दरम्यान कारवाई- नागपूर ते तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जातो. या मार्गावर अपघात वाढले. याचे कारण शोधले असता कळंंब ते उमरखेड दरम्यान अनेक ठिकाणी सोईने दुभाजक तोडल्याचे आढळून आले आहे.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPoliceपोलिस