कलामांची टुमदार अभ्यासिका वर्षभरानंतरही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 05:00 AM2020-10-15T05:00:00+5:302020-10-15T05:00:16+5:30

गेल्या काही वर्षात जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र त्यातील अनेकांना पुणे, दिल्लीत जाऊनच अद्ययावत तयारी करावी लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना यवतमाळातच अद्ययावत अभ्यासिका उपलब्ध व्हावी म्हणून नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५ कोटी रुपये मंजूर केले. त्यातून तीन मजली आणि वातानुकूलित अशी टुमदार इमारत साकारण्यात आली. संगणक, इंटरनेट आणि पुस्तकांचा खजिना आणून ही अभ्यासिका सजविण्यात आली आहे.

The beautiful study of arts is closed even after a year | कलामांची टुमदार अभ्यासिका वर्षभरानंतरही बंदच

कलामांची टुमदार अभ्यासिका वर्षभरानंतरही बंदच

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा अडसर : पाच कोटींचे दिमाखदार-वातानुकूलित बांधकाम वापराविना, विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

 अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच यवतमाळात होतकरू विद्यार्थ्यांसाठी तब्बल ५ कोटी रुपये खर्चून कलामांच्या नावाने दिमाखदार अभ्यासिका बांधण्यात आली. मात्र वर्ष उलटूनही या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना आणण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.
गेल्या काही वर्षात जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र त्यातील अनेकांना पुणे, दिल्लीत जाऊनच अद्ययावत तयारी करावी लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना यवतमाळातच अद्ययावत अभ्यासिका उपलब्ध व्हावी म्हणून नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ५ कोटी रुपये मंजूर केले. त्यातून तीन मजली आणि वातानुकूलित अशी टुमदार इमारत साकारण्यात आली. संगणक, इंटरनेट आणि पुस्तकांचा खजिना आणून ही अभ्यासिका सजविण्यात आली आहे. पुस्तकप्रेमी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी नाव या अभ्यासिकेला देऊन ११ सप्टेंबर २०१९ रोजी लोकार्पणही करण्यात आले. विशेष म्हणजे, येथे केवळ होतकरू विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवडही केली. परंतु, आता आठ महिने लोटूनही या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत प्रत्यक्ष प्रवेश मिळू शकलेला नाही.
जयंतीचा कार्यक्रमही नाही
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने ही अभ्यासिका साकारण्यात आली. अभ्यासिकेच्या लोकार्पणानंतर गुरुवारी पहिल्यांदाच डॉ. कलाम यांची जयंती आली आहे. विशेष म्हणजे हा दिवस ह्यवाचन प्रेरणा दिनह्ण म्हणून सर्वत्र साजरा होत असताना त्यांच्याच नावाची अभ्यासिका बंद आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे येथे विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. तसेच जयंतीचा कार्यक्रम करण्याबाबतही वरिष्ठांचे निर्देश नसल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजय शिरसाट यांनी सांगितले.

डॉ. कलामांनी यवतमाळात दिलेली ह्यतीह्ण पुस्तकभेट
यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालय परिसरातील विधी महाविद्यालयाच्या लोकार्पणासाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आले होते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चिक्कार गर्दी झाली होती. उंच मंचावर पाहुण्यांना येता यावे म्हणून रुंद रॅम्प उभारला होता. डॉ. कलाम रॅम्प चढत मंचावर आले. त्यांच्या हातात काही असल्याचे स्पष्ट जाणवत होते. तो पुस्तकांचा गठ्ठा होता. नियोजित जागेजवळ येताच त्यांनी टीपॉयवर ती पुस्तके ठेवली. उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले. उपस्थितांना संबोधित करण्यासाठी ते उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट झाला. परिसरातील कापूस, सोयाबीन या पिकांवर त्यांनी भाषणातून अभ्यासपूर्ण मत मांडताना ते मध्येच टीपॉयकडे गेले. पुस्तकांचा गठ्ठा उचलला आणि बाजूलाच बसलेल्या अमरावती विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरू डॉ. कमल सिंह यांना भेट दिला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी अन् परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही पुस्तके कामी पडतील, अशी पुस्तीही जोडली अन् नंतर पुढचे भाषण सुरू केले. राष्ट्रपतींच्या दिमतीला मोठा फौजफाटा असूनही कलामांनी पुस्तकांचा जड गठ्ठा स्वत: उचलावा, यावरूनच त्यांचे पुस्तकप्रेम यवतमाळकरांना पटले.
 

 

 

Web Title: The beautiful study of arts is closed even after a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.