रस्त्यावर फिरताना दक्ष राहा... कोरोना संकट गंभीर वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:43+5:30

सुरुवातीला परदेशातून आलेले नागरिक, नंतर तबलिकीचा प्रकार यातून रुग्ण वाढत गेले. मात्र प्रशासनाने आणि डॉक्टरांनी हे संकट यशस्वीपणे थोपविले, परतविले. परंतु मे महिना सुरू होताच परठिकाणी अडकलेल्या मजुरांना जिल्ह्यात एन्ट्री सुरू झाली आणि अडखळलेल्या कोरोनाने वेगान एन्ट्री सुरू केली. जिल्ह्यात मार्च-एप्रिलपर्यंत केवळ यवतमाळ शहर, त्यातही शहरातील विशिष्ट परिसरातच मोजके रुग्ण होते.

Be careful when walking on the road ... Corona crisis at a critical juncture | रस्त्यावर फिरताना दक्ष राहा... कोरोना संकट गंभीर वळणावर

रस्त्यावर फिरताना दक्ष राहा... कोरोना संकट गंभीर वळणावर

Next
ठळक मुद्दे समूह संसर्गाचा धोका वाढला : काळजी न घेतल्यास जिल्हा लवकरच तिसऱ्या टप्प्यात जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जेव्हा कोरोना संसर्गाची गती कमी होती, तेव्हा अत्यंत कठोर लॉकडाऊन आणि आता संसर्गाची गती प्रचंड वाढलेली असताना बाजारपेठ अनलॉक, असा उलटफेर झाल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. रुग्णांची दरदिवशी वाढणारी आकडेवारी बघता खुद्द प्रशासनानेच समूह संसर्गाचा धोका वर्तविला आहे. टाळेबंदी आणि संचारबंदीत थोडीशी शिथिलता मिळताच नागरिकांनी शहरात बेसुमार गर्दी करणे सुरू केले आहे. यातून कोरोना संकट तिसºया टप्प्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. प्रशासनाचे, सामाजिक संघटनांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे सामंजस्य आणि समन्वय हेच सूत्र या संकटातून जिल्ह्याला वाचवू शकते.
सुरुवातीला परदेशातून आलेले नागरिक, नंतर तबलिकीचा प्रकार यातून रुग्ण वाढत गेले. मात्र प्रशासनाने आणि डॉक्टरांनी हे संकट यशस्वीपणे थोपविले, परतविले. परंतु मे महिना सुरू होताच परठिकाणी अडकलेल्या मजुरांना जिल्ह्यात एन्ट्री सुरू झाली आणि अडखळलेल्या कोरोनाने वेगान एन्ट्री सुरू केली. जिल्ह्यात मार्च-एप्रिलपर्यंत केवळ यवतमाळ शहर, त्यातही शहरातील विशिष्ट परिसरातच मोजके रुग्ण होते. मात्र मेपासून कोरोना विषाणूने तालुके, तालुक्यातील खेडे व्यापले. आता चक्क ३७९ पर्यंत रुग्णसंख्या वाढली आहे. या दरम्यान १४ जणांना प्राणही गमवावे लागले. तर आजही शंभरावर नागरिक रुग्णालयात आणि शेकडो नागरिक विलगीकरणात, अलगीकरणात बंदिस्त आहेत.
लॉकडाऊन कठोर असताना रुग्णसंख्या त्रिशतकाच्या पलिकडे गेली. आता तर नागरिकांमधील प्रारंभीचे गांभीर्य संपले आहे. शिवाय लॉकडाऊनही अनलॉक झाले आहे. विशिष्ट वेळातच खरेदीची मुभा असताना नागरिक दिवसभर, काही जण रात्री देखील फिरत आहेत.

यंत्रणा उपाययोजना करीत आहे. मात्र नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाईचे अधिकार शासनाने स्थानिक पातळीवर दिले आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्स न पाळणाºयांना दंड केला जाईल. सर्व कंटेन्मेन्ट झोनची मी स्वत: पाहणी केली असून नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी.
- एम.डी. सिंह जिल्हाधिकारी.

Web Title: Be careful when walking on the road ... Corona crisis at a critical juncture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.