लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आरक्षणातील बढती हा मागासवर्गीयापुढील महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक क्षेत्रातील अनुशेष भरणे अजून बाकी आहे. मागासवर्गीयांनी समाजापुढील धोके ओळखून संघटीतपणे काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केले.दी बुद्धिस्ट पेन्शनर्स सोशल असोसिएशनच्या वार्षिक सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. दोन सत्रात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र टेंभुर्णे होेते. शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, दीपक नगराळे, अॅड. गोविंद बनसोड, के. पी. कांबळे, बी. ए. पाढेण, रामदास नाईक, के. डी. भगत, कोषाध्यक्ष ए. जी. कांबळे, जे. सी. तायडे, प्रमोद रंगारी, जे. डी. मनवर, एन. जे. थूल, माजी डीवायएसपी सदाशिवराव भालेराव, आनंद भगत, काशिनाथ ब्राह्मणे, डांगे, महेंद्र भगत, डी. एस. खडसे, अशोक निमसरकर, रा. वी. नगराळे, बी. टी. वाढवे, अशोक खडसे, रमेश पेटकर उपस्थित होते.यावेळी माजी अध्यक्ष व्ही. पी. पाटील, जातपडताळणी समिती उपायुक्त जया राऊत, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भवरे यांचा सत्कार करण्यात आला. संकल्प संस्थेचे अध्यक्ष युवराज मेश्राम यांच्याकडून मिळालेल्या प्रत्येक दोन हजार रुपयांच्या धनादेशाचे आठ गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
मागासवर्गीयांनी संघटीतपणे काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:02 IST
आरक्षणातील बढती हा मागासवर्गीयापुढील महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक क्षेत्रातील अनुशेष भरणे अजून बाकी आहे.
मागासवर्गीयांनी संघटीतपणे काम करावे
ठळक मुद्देकृष्णा इंगळे : बुद्धिस्ट पेन्शनर्स सोशल असोसिएशनची सभा