शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यमान उपकेंद्र नामधारी; खासगीत घ्यावे लागतात उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 17:49 IST

Yavatmal : तळणी उपकेंद्राचा बेताल कारभार

लोकमत न्यूज नेटवर्क कुन्हा (तळणी) : नागरिकांना गावापासून जवळच आरोग्यविषयक उपचार मिळावे यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, काही ठिकाणचे उपकेंद्र नामधारी ठरले आहे. यातीलच एक तळणी (कुन्हा) येथील उपकेंद्र आहे. हे उपकेंद्र कर्मचाऱ्यांच्या सोईनुसार चालते. अनेकदा नागरिकांना आरोग्य विषयक सेवा मिळत नाही. समुदाय आरोग्य अधिकारी (डॉक्टर) सुटीवर असल्यास औषधोपचार परिचारिकेकडून केला जातो.

भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तळणी आरोग्य उपकेंद्र आहे. या केंद्राच्या कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याठिकाणी नियुक्त असलेले डॉक्टर, कर्मचारी अपवादानेही मुख्यालयी राहत नाही. ही बाब नित्याची झालेली आहे. त्यांची मनमानी सुरू आहे. उपकेंद्र केव्हा उघडायचे, केव्हा बंद करायचे, उघडायचे की नाही, हे सर्व तेच ठरवतात. यासाठी कारणेही ठरलेली आहेत. 

सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:२५ वाजता आरोग्य उपकेंद्र बंद होते. रुग्ण तपासणी सुरू होण्याची वेळ सकाळी ८:३० वाजताची आहे. याविषयी आरोग्य उपकेंद्र कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता सीएचओ (समुदाय आरोग्य अधिकारी), एमपीडब्ल्यू (आरोग्य कर्मचारी) सुटीवर असल्याचे सांगण्यात आले. एका आरोग्य सेविकेची रात्रपाळीत कामगिरी होती, तर दुसरी आरोग्य सेविका गावात व्हिजिट देत असल्याची माहिती देण्यात आली. आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे. परंतु, याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांना खासगी डॉक्टरकडे मदत घ्यावी लागते. 

तळणी आरोग्य उपकेंद्राची निवासस्थाने अडगळीततळणी येथील आरोग्य उपकेंद्राचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आलेली आहेत. मात्र, याचा उपयोग होत नसल्याने ती अडगळीत पडली आहे. या कामांवर लाखो रुपये खर्च करण्यात आलेला आहे. तो व्यर्थ ठरत असल्याचे दिसून येते.

"डॉक्टर रजेवर असल्यास इतर कर्मचारी आयुष्यमान आरोग्य मंदिराचा कारभार सांभाळतात. सोमवारी सीएचओ, आरोग्यसेवक सुटीवर होते. आरोग्यसेविका व्हिजिटला गेल्या होत्या." - ऋतुश्री राऊत, सीएचओ, तळणी

"आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. यासंदर्भात ग्रामपंचायत स्तरावरून आरोग्य विभागाला पत्र देण्यात आहे आहे. विभागाने पत्राकडे दुर्लक्ष केले आहे." - श्रीराम मेश्राम, सरपंच, तळणी (कुहा)

टॅग्स :Yavatmalयवतमाळ