शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

शहरानजीकच्या ग्रामपंचायती विकासापासून कोसो दूर

By admin | Updated: February 24, 2016 02:51 IST

गेल्या काही वर्षांमध्ये पुसद शहराची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नगरपरिषद क्षेत्राएवढाच भार

पुसद : गेल्या काही वर्षांमध्ये पुसद शहराची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नगरपरिषद क्षेत्राएवढाच भार शहरालगतच्या चार ते पाच ग्रामपंचायतींवर आला आहे. परंतु ग्रामपंचायतचे बजट हे अत्यल्प असल्यामुळे या भागाचा विकास खुंटला आहे. अद्यापही हा भाग विकासापासून कोसो दूर आहे. येथील नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात गायमुख ग्रामपंचायतचा समावेश करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने पारित करून उपविभागीय अधिकाऱ्यांना तसे निवेदन देऊन मागणी केली आहे. त्यामुळे आता विकासापासून वंचित असलेल्या पुसद शहरानजीकच्या श्रीरामपूर, धनकेश्वर, काकडदाती, बोरगडी या ग्रामपंचायतींचाही पुसद नगरपरिषदेत समावेश करण्यात येऊन तेथील परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. शहराला लागून असलेल्या ग्रामपंचायत गायमुख नगरचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी मासिक सभेत पुसद नगरपरिषदेत समावेश करण्याचा ठराव घेण्यात आला. गणेश राठोड यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला सुधाकर जाधव यांनी अनुमोदन दिले आणि सर्वानुमते हा प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांना भेटून सरपंच पद्मावती खिल्लारे, उपसरपंच सुभाष राठोड, गणेश राठोड, रेखा राठोड, लतिफा बेगम पीर खाँ, बेबी खंदारे, शालू गुंडाप्पा, कापसे आदींनी निवेदन दिले. पुसद शहरालगत श्रीरामपूर, धनकेश्वर, काकडदाती, बोरझडी व गायमुखनगर या ग्रामपंचायती असून, सर्वांची मिळून ५० हजारावरून अधिक लोकसंख्या आहे. हा संपूर्ण परिसर विकासापासून कोसो दूर आहे. पूर्वी जकातनाका असताना काही चाणक्ष व्यावसायिकांनी शहराच्याबाहेर गोदाम बांधले आहे. पुसद शहराची लोकसंख्या जैसे थे आहे पण शहरालगत जणू जुळे शहर श्रीरापूर वसले आहे. श्रीरामपूरजवळ काकडदाती आहे. अलिकडे पुस नदीच्या पात्रातील पूरग्रस्तांचे मधुकर नाईक नगर वसले आहे. त्याला ‘दुबई’ असे संबोधले जाते. ‘दुबई’चा गायमुख नगर ग्रामपंचायती समावेश होतो. त्यामुळे गायमुखसह इतरही शहरालागतच्या चार ते पाच ग्रामपंचायतींचा पुसद नगरपरिषदेत समावेश करण्याची मागणी तेथील नागरिकांची आहे. (तालुका प्रतिनिधी)