शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात पुरस्कार वितरण सोहळा

By admin | Updated: November 17, 2015 04:08 IST

गत पिढीतील ख्यातनाम मराठी कथा लेखक, पत्रकार, कै.प्रा.शरश्र्चंद्र टोंगो जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकमतने

यवतमाळ : गत पिढीतील ख्यातनाम मराठी कथा लेखक, पत्रकार, कै.प्रा.शरश्र्चंद्र टोंगो जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकमतने आयोजित केलेल्या राष्ट्रीयस्तर कथा स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता यवतमाळ येथील दर्डा मातोश्री सभागृहात होत आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे अर्थमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.अध्यक्षस्थानी लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग, इतिहास तज्ज्ञ अरुण हळबे उपस्थित राहणार आहे. कथा लेखक, पत्रकार, कै.प्रा.शरश्र्चंद्र टोंगो हे यवतमाळचे भूषण मानले गेलेले व मराठी कथा विश्वाला एक वेगळे व आकर्षक वेगळे वळण देणारे कथा लेखक होते. खांडेकर, फडके व माडगुळकरांसारखे ज्येष्ठ कथा लेखक ज्या काळात लिहित होते. त्या काळात आपल्या कथेचा आगळा ठसा उमटविण्याचा मान कै.प्रा. टोंगो यांच्याकडे जातो. त्यांनी लोकमतच्या आरंभ काळात त्यात लेखन केले व त्याचा वाङ्मयीन दर्जा उंचावला. त्यांच्या लिखानाने लोकमत एवढेच मराठी साहित्यही प्रगल्भ झाले. विदर्भ आणि महाराष्ट्रात त्यांचे साहित्य क्षेत्रात नाव आदराने घेतले जाते. बाल साहित्याच्या क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविला होता. लोकमतच्यावतीने आयोजित राष्ट्रीयस्तर कथा स्पर्धेत मराठीतील ५०० हून अधिक लेखक व लेखिकांनी भाग घेतला. या सहभागात तामिळनाडूपासून महाराष्ट्रपर्यंतचे अनेक नवे व जुने लेखक एकत्र आले. या कथामधून पुरस्कारासाठी कथांची निवड करणे अवघड व्हावे एवढ्या या सगळ्या कथा दमदार व चांगल्या होत्या. लोकमत नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार आणि ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांनी हे जिकरीचे काम हसतमुखाने व आस्थेने पूर्ण केले.या सोहळ्याला लोकमत, कै.प्रा. टोंगो यांच्या विस्तृत परिवारातील साऱ्यांनी अगत्याने उपस्थित रहावे, अशी विनंती लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले आहे. (उपक्रम प्रतिनिधी)