शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अंजी जंगलातून ‘अवनी’चा बछडा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 06:22 IST

गेल्या काही दिवसांपासून हत्तीच्या ताफ्यासह शोध मोहिमेवर असलेल्या वनविभागाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ४ वाजता राळेगाव परिसरातील अंजीच्या जंगलातून ‘अवनी’च्या एका मादी बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले.

पांढरकवडा (यवतमाळ) : गेल्या काही दिवसांपासून हत्तीच्या ताफ्यासह शोध मोहिमेवर असलेल्या वनविभागाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ४ वाजता राळेगाव परिसरातील अंजीच्या जंगलातून ‘अवनी’च्या एका मादी बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. लगेच त्या बछड्याला पेंच अभयारण्याकडे रवाना करण्यात आले. एक बछडा आणि वाघ अद्यापही त्याच परिसरात असून त्यांनाही लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.१३ जणांचे बळी घेणाºया नरभक्षी अवनी वाघिणीला २ नोव्हेंबरच्या रात्री गोळी घालून ठार मारल्यानंतर तिचे दोन बछडे अनाथ झाले. त्यांना सुरक्षित पकडून इतरत्र हलविण्यासाठी लगेच हालचाली सुरू झाल्या. शनिवारी राळेगाव परिसरातील अंजीच्या जंगलातील कक्ष क्रमांक ६५५ मध्ये दोन बछड्यांपैकी मादी बछड्याला डार्ट करून बेशुद्ध करण्यात यश आले.लगेच त्याला पकडून विशेष वाहनाद्वारे पेंच अभयारण्याकडे रवाना करण्यात आले. आता सी-१ नामक नर बछडा व एक वाघ या दोघांना पकडण्याच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे.४ हत्तीणी होत्या मागावरगेल्या दीड महिन्यापासून हे दोन्हीही बछडे कॅमेरात ट्रॅप होत असले तरी वनविभागाच्या पथकाला मात्र ते हुलकावणी देत होते. ८० हेक्टर जंगलाला कुंपन अंजी धरण परिसरात या बछड्यांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाल्यानंतर वनविभागाने तब्बल ८० हेक्टर जंगल परिसराला १० फूट उंच जाळीचे कुंपण करून त्यावर कापड बांधले. शिवाय मध्यप्रदेशातून या बछड्यांना पकडण्यासाठी चार हत्तींनाही पाचारण करण्यात आले होते

टॅग्स :Tigerवाघ