शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

हरीण शिकार प्रकरणातील आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:26 IST

गेल्या दीड वर्षांपासून सतत गुंगारा देणाऱ्या हरीण शिकार प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात अखेर वन विभागाला यश आले. मात्र अद्याप दोन आरोपी फरारच आहे.

ठळक मुद्देदीड वर्षे लोटली : अद्याप दोन आरोपी फरारच, वन विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गेल्या दीड वर्षांपासून सतत गुंगारा देणाऱ्या हरीण शिकार प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात अखेर वन विभागाला यश आले. मात्र अद्याप दोन आरोपी फरारच आहे.मराठवाड्यातील निवघा शिवारात १२ जुलै २०१६ रोजी उमरखेड तालुक्यातील दिंडाळा येथील वसंता भीमराव राठोड, गजानन यशवंत जाधव, दिनेश अशोक जाधव, दिलीप गणपत जाधव व संजय गणपत जाधव यांनी दोन हरिणांची शिकार केली. तेथून दुचाकीवर मांस आणत असताना वन चौकीतील पोलिसांनी त्यांना हटकले. त्यावेळी पाचपैकी चार जणांनी पळ काढला. पोलिसांनी दिनेश जाधव याला पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले होते. मात्र वन विभागाला गुंगारा देऊन तोसुद्धा फरार झाला होता.या प्रकरणात कर्तव्यात कसुरीचा ठपका ठेवत दोन वनरक्षक व एका वनमजुराला निलंबित करण्यात आले होते. वनविभागात बहुचर्चित या प्रकरणातील आरोपी मात्र फरार होते. वन विभागात त्यांच्या मागावर होता. यापैकी वसंता राठोड हा शहरात येत असल्याच्या माहितीवरून ९ मे रोजी त्याला अटक केली. त्यानंतर गजानन जाधव याला दिंडाळा येथून तर दिनेश जाधवला आंध्रप्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील पेंडलवाडा येथून अटक करण्यात आली. वनक्षेत्रपाल रत्नपारखी यांच्या फिरत्या या दोघांना अटक केली. अद्याप दिलीप जाधव व संजय जाधव हे दोन आरोपी फरार आहे.उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वन अधिकारी अमोल थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी विठ्ठल मळघणे, वनपाल प्रिया पोटेकर, वनरक्षक एम.ए.पठाण, एन.पी.गाजुलवार यांनी ही कारवाई पार पाडली. आता दोन आरोपींना अटक करण्याचे आव्हान आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा