शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे तातडीने करा; नुकसानग्रस्तांची मानसिकता समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 17:43 IST

Nagpur : आढावा बैठकीत आमदार नामदेव ससाणे यांचे यंत्रणेला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : उमरखेड व महागाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरटा, चिखली व दराटी येथील घरे पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे. या पाश्वभूमीवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली. यावेळी घरासह शेतीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात यावे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देऊ नका, असे निर्देश आमदार नामदेव ससाणे यांनी यंत्रणेला दिले.

अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली आहे. सर्वेक्षण करतेवेळी शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्तांची मानसिकता समजून घ्या. त्यांना दिलासा द्या, असे आवाहन करण्यात आले. उमरखेड तालुक्यात ६५ हजार ५१० हेक्टर पेरणीची नोंद असून, २५ हजार ५२१ हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातली दळणवळण व्यवस्था पावसात खराब झालेल्या रस्त्यामुळे थांबायला नको, यासाठी रस्ता दुरुस्तीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. पुरापासून धोका निर्माण झालेल्या गावात आरोग्याच्या दृष्टीने गावागावात फवारणी करा, अशा सूचना करून सिंचन विभागातील अधिकाऱ्यांना प्रत्येक नुकसानग्रस्त गावातील नाल्यावर संरक्षक भिंतीसाठी अहवाल पाठविण्याचे सांगितले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, उमरखेड व महागाव तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपकार्यकारी अभियंता सा.बां. विभाग जि.प. बांधकाम विभाग क्र. २. उपकार्यकारी अभियंता मराविमं, उपकार्यकारी अभियंता जलजीवन मिशन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांसह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वीज वितरणच्या अभियंत्याला धारेवर धरलेशांतता समितीच्या बैठकीला गैरहजर असणारे वीज वितरणचे अभियंता जैन हे आढावा बैठक संपत असताना आले. उत्सव काळात रात्रीच्या वेळी वीज गायब होते. महिनाभरापासून प्रत्येक दहा मिनिटांत तीन वेळा वीज ट्रिप होते. वीज वितरणने उमरखेड शहराला वाऱ्यावर सोडल्याने आमदार ससाणे यांनी अभियंत्यांना धारेवर धरले. शहर आधीच संवेदनशील आहे. उत्सवाच्या काळात बत्ती गुल व्हायला नको, असे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :Agriculture Schemeकृषी योजनाfarmingशेतीYavatmalयवतमाळ