शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

यवतमाळात सुपर स्पेशालिटीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी २५०बेड्सची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 19:44 IST

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल त्वरीत सुरू करण्यात येणार आहे. कोरानाबाधित रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटीमध्ये येत्या दोन - तीन दिवसांत 250 बेड्सची व्यवस्था तातडीने करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

ठळक मुद्देपीपीई किट घालून आयसोलेशन वॉर्डातील रुग्णांची विचारपूस

 लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कोव्हीड हॉस्पीटल, जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये रुग्णांसाठी भरतीची व्यवस्था आहे. मात्र कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल त्वरीत सुरू करण्यात येणार आहे. कोरानाबाधित रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटीमध्ये येत्या दोन - तीन दिवसांत 250 बेड्सची व्यवस्था तातडीने करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राज कुमार, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता रुग्णांवर वेळेत उपचार होणे गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, प्रत्येक बेडपर्यंत ऑक्सीजन पुरवठा झाला पाहिजे. कोव्हीड हॉस्पीटल व्यतिरिक्त सर्जरी वॉर्डात कोरोनाबाधित रुग्णांसाठी 100 ऑक्सीजन पॉईंट वाढवा. तसेच येथे ऑक्सीजन प्लाँट तयार  करता येईल का, याबाबत प्रशासनाने नियोजन करावे. आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजनचे 500 सिलिंडर येत होते. उद्यापासून मात्र ही संख्या दुप्पट करण्यात आली असून आता एक हजार सिलींडर येणार आहे. केवळ मेडीसीन विभागाच्या डॉक्टरांनीच कोरोनाबाधितांवर उपचार न करता, सर्व विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर्स, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांनी संयुक्तरित्या रुग्णांवर उपचार करावे. येथे रिक्त असलेली डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी आदी पदे तातडीने भरण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. येथील उपचाराबाबत रुग्ण समाधानी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी पीपीई किट घालून आयसोलेशन वॉर्डात भेट दिली. तसेच उपचार आणि येथे पुरविण्यात येणा-या सोयीसुविधांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णांची संवाद साधला. तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या बांधकामाची पाहणी केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSanjay Rathodसंजय राठोड