शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत पुन्हा एकदा निर्घृण खून, क्षुल्लक वादात तरुणाला भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

आर्णी शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाची मालिका सुरू आहे. कुऱ्हा - डुमणी येथे काकूनेच तीन वर्षीय पुतणीची हत्त्या केली होती. काही दिवसांपूर्वी शहरात सुनेनेच सासूची बंदुकीची गोळी घालून हत्त्या केली होती. खेडबीड येथेही युवकाने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केला होता. ५ मार्च रोजी भाजी मंडीत एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर नुकताच शिक्षक पतीने पत्नीचा खून केला होता. आता पुन्हा युवकाचा खून झाला. त्यामुळे खुनाची मालिका सुरूच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : रंगपंचमीच्या दिवशी नाचण्याच्या वादातून एका युवकाला तीन युवकांनी चाकूने भोसकले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास येथील गणपती मंदिर चाैकात घडली. अतिष महादेव ढोले (३०, रा. आर्णी) असे मृत युवकाचे नाव आहे. चंदन मनोज सोयाम (२४), संदीप विजय पेंदोर (१९) आणि रोहन मनोज सोयाम (२४, सर्व रा. आर्णी) अशी आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास गणपती मंदिर चाैकात त्यांच्यात नाचण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. तिघांनीही अतिषला चाकूने भोसकले. काही वेळातच अतिष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनास्थळी काही वेळातच नागरिकांची गर्दी झाली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अतिषला उपचारासाठी रवाना केले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळावरून आरोपी पळून जात होते. त्यापैकी रोहन मनोज सोयाम हा जमावाच्या हाती लागला. जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, या प्रकरणी मृतक अतिषच्या भावाने पोलिसात तक्रार दिली. त्यात चाैघांनी आपल्या भावाला मारल्याचे नमूद केले. पोलिसांनी तूर्तास भादंवि ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटकही केली आहे. यातील चाैथ्या आरोपीचा शोध सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी शुक्रवारी रात्रीच भेट दिली. दरम्यान या घटनेतील आरोपी  चंदन मनोज सोयाम (२४), संदीप विजय पेंदोर (१९) आणि रोहन मनोज सोयाम (२४, सर्व रा. आर्णी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोठडी दरम्यान या आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आर्णी शहर आणि तालुक्यात खुनाच्या घटना वाढल्या आहे. मानवी नावाच्या चिमुकलीच्या हत्येने सुरू झालेले हे सत्र सुनेने केलेल्या गोळीबारानंतर तरी पोलीस रोखतील अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली असून आतापर्यंत तब्बल पाच जणांचा खून झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

खुनाची मालिका सुरूच- आर्णी शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाची मालिका सुरू आहे. कुऱ्हा - डुमणी येथे काकूनेच तीन वर्षीय पुतणीची हत्त्या केली होती. काही दिवसांपूर्वी शहरात सुनेनेच सासूची बंदुकीची गोळी घालून हत्त्या केली होती. खेडबीड येथेही युवकाने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केला होता. ५ मार्च रोजी भाजी मंडीत एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर नुकताच शिक्षक पतीने पत्नीचा खून केला होता. आता पुन्हा युवकाचा खून झाला. त्यामुळे खुनाची मालिका सुरूच आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी