शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

आर्णीची आरोग्य सेवा सलाईनवर

By admin | Updated: December 25, 2016 02:35 IST

तालुक्याची आरोग्य सेवा कोलमडली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे ही सर्वात मोठी समस्या आहे.

रुग्णांची गैरसोय : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त हरिओम बघेल आर्णी तालुक्याची आरोग्य सेवा कोलमडली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे ही सर्वात मोठी समस्या आहे. या प्रकारात रुग्णांची गैरसोय सुरू आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना नाईलाजाने तालुक्याच्या ठिकाणी येऊन उपचार घ्यावे लागत आहे. यात त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करण्यासोबतच वेळेचाही अपव्यय होत आहे. सातही दिवस २४ तास आरोग्य सेवा दिली जाईल, असे शासनाकडून सांगितले जाते. मात्र वास्तविकता वेगळीच आहे. तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र, तर दोन आयुर्वेद रुग्णालय आहेत. या सहा केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दहा पदे मंजूर आहेत. यातील दोन पदे रिक्त आहेत. कार्यरत असलेल्या आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी दोन वैद्यकीय अधिकारी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी सतत बाहेर असतात. डॉ. आम्रपाली गवळी आणि डॉ. राहुल वाघमारे यांची नियुक्ती लोणबेहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे. मात्र त्यांना सातत्याने शस्त्रक्रियेसाठी बाहेर पाठविले जाते. सदर आरोग्य केंद्र महामार्गाला लागून आहे. याठिकाणी रुग्णांची सतत ये-जा सुरू असते. अपघात, गंभीर रुग्ण याठिकाणी येतात. त्यामुळे डॉक्टरांची उपस्थिती याठिकाणी आवश्यक आहे. मात्र तसे होत नाही. डॉ. महेश लमगे हे २० नोव्हेंबर, तर डॉ. विशाखा खडसे २७ आॅक्टोबरपासून वैद्यकीय रजेवर आहेत. एकाची नियुक्ती सावळीसदोबा, तर एकाची लोणी येथील आरोग्य केंद्रात आहे. या दोनही ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांची गैरसोय सुरू आहे. कवठा(बाजार) येथील आयुर्वेदिक रुग्णालयात नियुक्ती असलेल्या डॉ. रश्मी आडे यांना सावळीसदोबा येथील आरोग्य केंद्राचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे कवठा(बाजार) येथे रुग्णांची गैरसोय होत आहे. भानसरा येथील आयुर्वेद रुग्णालयात नियुक्त असलेले डॉ. दीपक आलनदास यांची अतिरिक्त नियुक्ती म्हसोला प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्याने भानसरा येथील रुग्णांना तत्काळ आणि योग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामानिमित्तही आरोग्य केंद्र सोडावे लागते. या प्रकारात नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतो. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरून आरोग्याचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.