आर्णी : नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड बुधवारी अविरोध पार पडली. प्रत्येक समितीकरिता केवळ एकच अर्ज आल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी निवड अविरोध झाल्याची घोषणा केली.शिक्षण व नियोजन सभापतिपदी उपाध्यक्ष नीता खुशाल ठाकरे कायम राहिल्या, तर बांधकाम सभापतिपदी भागचंद लोया, पाणीपुरवठा सभापतिपदी जावेद सोलंकी, आरोग्य सभापतिपदी अनिता सुनील भगत, महिला व बालकल्याण सभापतिपदी ज्योती तुळशीदास मोरकर, तर उपसभापतिपदी गौसिया परवीन अक्रम शहा या काँग्रेसच्या नगरसेवकांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे गटनेते अनिल आडे व शिवसेनेचे गटनेते प्रवीण मुनगिनवार यांनी नामनिर्देशित समिती सदस्यांची यादी अध्यासी अधिकाऱ्यांना दिली. प्रत्येक विषयाकरिता केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याने अध्यासी अधिकारी उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सभापतींची निवड अविरोध झाल्याची घोषणा केली. यावेळी मुख्याधिकारी निर्मला रासीनकर, काँग्रेस व शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष आरिज बेग यांनी नवनिर्वाचित सभापतींचे स्वागत केले. (तालुका प्रतिनिधी)घाटंजी : संगीता भुरे बांधकाम सभापतीघाटंजी : घाटंजी नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया बुधवारी पार पडली. सर्व चारही सभापती अविरोध निवडले गेले. यात दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन काँग्रेसचे सभापती आहेत. बांधकाम सभापतीपदी संगीता भुरे यांची निवड झाली. आरोग्य सभापतीपदी राम खांडरे, शिक्षण सभापती जयश्री धांदे, तर महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी अर्चना घोडे यांची निवड झाली आहे. निवड प्रक्रिया राळेगावचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते आणि मुख्याधिकारी ए.बी. वीर यांनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)नेरमध्ये संजय दारव्हटकरांकडे बांधकाम सभापतीपदनेर : नेर नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड बुधवारी झाली. सर्व पदाधिकारी अविरोध निवडले गेले. बांधकाम सभापतीपदी संजय दारव्हटकर यांची निवड झाली आहे. विनोद जयसिंगपुरे यांच्याकडे शिक्षण सभापतीपदाची जबाबदारी आली आहे. मोहन भोयर हे आरोग्य सभापती, तर पाणीपुरवठा सभापतीपदी संध्याताई चिरडे यांची निवड झाली आहे. महिला व बाल कल्याण सभापतीपदी रूपाली दहेलकर, तर उपसभापती म्हणून वैष्णवी गुल्हाने यांची निवड झाली आहे. स्थायी समितीचे सभापती नगराध्यक्ष पवन जयस्वाल आहे. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, मुख्याधिकारी धीरजकुमार गोहोड यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)
आर्णी, घाटंजी, नेर नगरपरिषदेत विषय समिती सभापती अविरोध
By admin | Updated: December 17, 2015 02:40 IST