शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी मतदार संघात भाजपला ५७ हजारांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 22:07 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात समाविष्ठ असलेल्या आर्णी या आमदार राजू तोडसाम यांच्या विधानसभा मतदार संघात भाजपच्या हंसराज अहीर यांनी तब्बल ५७ हजार ६९८ मतांची आघाडी घेतली. रात्री उशिरा जाहीर झालेल्या अंतीम निकालानुसार आर्णी विधानसभा क्षेत्रातून भाजपचे हंसराज अहीर यांना एक लाख २६ हजार ६४८ तर कॉंग्रेसचे बाळू धानोरकर यांना ६८ हजार ९५७ मते मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात समाविष्ठ असलेल्या आर्णी या आमदार राजू तोडसाम यांच्या विधानसभा मतदार संघात भाजपच्या हंसराज अहीर यांनी तब्बल ५७ हजार ६९८ मतांची आघाडी घेतली. रात्री उशिरा जाहीर झालेल्या अंतीम निकालानुसार आर्णी विधानसभा क्षेत्रातून भाजपचे हंसराज अहीर यांना एक लाख २६ हजार ६४८ तर कॉंग्रेसचे बाळू धानोरकर यांना ६८ हजार ९५७ मते मिळाली. वंचितचे राजेंद्र महाडोळे यांना नऊ हजार ६८० मतांवर समाधान मानावे लागले.चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी व आर्णी या सहाही विधानसभा मतदार संघापैकी आर्णी मतदार संघातून भाजपला तब्बल ५७ हजार ६९६ मतांची आघाडी मिळाल्यामुळे आर्णी मतदारसंघ सध्या चर्चेत आला आहे. राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा या सर्वच विधानसभा क्षेत्रात हंसराज अहीर यांना फटका बसला आहे. या एकाही मतदार संघात अहीरांना आघाडी घेता आली नाही.हंसराज अहीर यांचा निवडणुकीत पराभव झाला असला तरी आर्णीचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी त्यांच्या मतदारसंघातून अहीर यांना मोठी आघाडी मिळवून दिल्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. आर्णी मतदार संघातील आर्णी, घाटंजी, पांढरकवडा या तीन तालुक्यातील गावांमध्ये हंसराज अहीर व राजू तोडसाम यांनी आपआपल्या निधीतून तसेच विविध योजनांतून मतदार संघात केलेली विकास कामे, यामुळे ग्रामीण भागातील मतदारांनी अहीरांना पसंती दिल्याचे दिसून येत आहे.तोडसाम यांच्या उमेदवारीचा मार्ग झाला मोकळाचंद्रपूर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा क्षेत्रापैकी केवळ आर्णी या आमदार राजू तोडसाम यांच्या मतदार संघात भाजपच्या हंसराज अहीर यांनी तब्बल ५७ हजार ६९६ मतांची आघाडी घेतल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार राजू तोडसाम यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते.

टॅग्स :BJPभाजपा