शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

आर्णीत चणा खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:00 AM

दरवर्षी चणा उत्पादनात वाढ होत आहे. तालुक्यातील हजारो शेतकरी हरभऱ्याचे उत्पन्न घेत आहे. चणा विकून खरिपातील बियाणे व खताची तजवीज केली जाते. मात्र विक्रीसाठी नोंद करूनही अद्यापही तालुक्यात नाफेडने खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. त्यांच्यासमोर खरिपातील लागवडीचा प्रश्न उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : नाफेडकडून शेतकऱ्यांना खरेदीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यात यावर्षी साडेतीन हजार हेक्टरवर चण्याचे उत्पादन घेण्यात आले. मात्र नाफेडने चणा खरेदी सुरू न केल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहे.दरवर्षी चणा उत्पादनात वाढ होत आहे. तालुक्यातील हजारो शेतकरी हरभऱ्याचे उत्पन्न घेत आहे. चणा विकून खरिपातील बियाणे व खताची तजवीज केली जाते. मात्र विक्रीसाठी नोंद करूनही अद्यापही तालुक्यात नाफेडने खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. त्यांच्यासमोर खरिपातील लागवडीचा प्रश्न उभा ठाकला आहे. नाफेडने हरभऱ्याला प्रतिक्विंटल चार हजार ८७५ रुपयांचा दर निश्चित केला आहे. मात्र खरेदी सुरू न केल्याने चणा उत्पादकांना खुल्या बाजारात कमी दराने विक्री करावी लागत आहे.खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर प्रतिक्विंटल हजार ते १२०० रुपयांनी कमी मिळत आहे. त्यात यावर्षी लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने बाजारपेठ बंद होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काळातही काही इतर शेतमालाची शासनाने खरेदी सुरू केली.चणा खरेदीसाठी मात्र कुणीच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे अद्यापही शेतकऱ्याच्या घरात हरभरा साठवून आहे. १५ जूननंतर चण्याची खरेदी सुरू होईल, असे सांगितले जात आहे. मात्र तोपर्यंत पेरणी करावी लागणार आहे. त्यासाठी आर्थिक तजवीज करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.२१०० शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणीतालुक्यातील दोन हजार १०० शेतकऱ्यांनी चणा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. आजच्या घडीलासुद्धा नोंदणी सुरूच आहे. मात्र खरेदी नेमकी कधी सुरू होणार, याबाबत यंत्रणा काहीही सांगण्यास तयार नाही. परिणामी शेतकऱ्यांना पडेल भावाने चणा विक्री करावी लागणार आहे. आवक कमी झाल्यानंतर नाफेड खरेदी सुरू करण्याची शक्यता आहे. यात शेतकरी वेठीस धरला जात आहे. चणा निघून दोन महिने झाल्यानंतरही खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. या संकट काळात शासन आणि लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड