शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण; पिकांची नासाडी, शेतकरी चिंतातूर

By सुरेंद्र राऊत | Updated: September 7, 2022 16:29 IST

नेर तालुक्यातील शेतकरी झालेत हतबल

नेर (यवतमाळ) : तालुक्यातील संपुर्ण परिसरामध्ये शेतकऱ्यांना आसमानी संकटासह विविध समस्यांनी घेरले आहे. अगोदरच शेतकऱ्यांनी पेरणी करून सुद्धा त्यावर पाऊस न आल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे पीके खरडुन गेल्याने पुन्हा पेरणी करावी लागली. आता पीक कसेबसे तग धरून असताना त्यावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीनच्या झाडाची पाने या अळ्या फस्त करत आहे. पिकाचे संरक्षण कसे करावे याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

पीक परिस्थिती सुधारित असताना सततधांर पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे कृषी विभागाने पाहणी केली. शेतकरी हा दोन महिन्यापासून संततधार पाऊस असल्याने चिंतातुर होता. यामध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या शेतात जमिनीसह पिके खरडून गेली. या नैसर्गिक संकटामुळे पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. हे संकट काहीसे दूर होत नाही तर तालुक्यात वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी करण्यात आली. पीक वाचवण्याकरिता शेतकऱ्यांना अतोनात प्रयत्न करावे लागत आहे.पिकांची परिस्थिती चांगली असतानाच सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे आहे. 

शेतकऱ्यांना शेतातील पीक घरी येईल की नाही याची चिंता वाटत आहे. यावर्षी पेरणीच्या काळात उगवलेल्या कोवळ्या पिकांवर गोगलगायीने सुद्धा हल्ला केला होता. यातून कसेबसे पीक वाचविले. आता सोयाबीन पीक लष्करी अळी फस्त करीत आहे. त्यामुळे कृषी विभागाने सरसकट शेतातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे. या गावांमध्ये अळीचा सर्वाधिक प्रकोपआता तालुक्यातील परजना, अडगाव, पांढरी ,खोलापुरी, शिरजगाव खानापूर, खरडगाव, दोनद, उमरठा इतर शिवारातील शेतकऱ्यांना अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कीटकनाशकाचे फवारे करूनही अळी नियंत्रणात येताना दिसत नाही. स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडून मात्र या संकटाबाबत कुठल्याही उपाययोजना सांगितल्या जात नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती