शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

उमरखेड, पुसदमध्ये शस्त्रसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:04 IST

ढाणकी येथे देशी कट्ट्यासह तरुणाच्या अटकेची शाई वाळते न वाळते तोच उमरखेड आणि पुसदमध्ये बंदूक, जीवंत काडतूस आणि धारदार शस्त्रासह तीन तरुणांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देएसडीपीओंची कारवाई : बंदूक, जीवंत काडतूस, चाकुचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड/पुसद : ढाणकी येथे देशी कट्ट्यासह तरुणाच्या अटकेची शाई वाळते न वाळते तोच उमरखेड आणि पुसदमध्ये बंदूक, जीवंत काडतूस आणि धारदार शस्त्रासह तीन तरुणांना अटक करण्यात आली.उमरखेड येथे एक इसम पुसद येथून हत्यार घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांना मिळाली. त्यावरून ठाणेदार हनुमंत गायकवाड यांच्या पथकाने तहसील जवळ सापळा रचला. एका इसमावर पोलिसांचा संशय आला. त्याची झडती घेतली असता एक गावठी बंदूक, पाच जीवंत काडतूस, तीन चाकू आढळून आले. मुबलिक कय्यूम खान (२२) रा. वसंतनगर पुसद असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे ढाणकी येथे देशीकट्ट्यासह त्याला ७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्याची न्यायालयाने जामीनावर सुटका केल्यानंतर सोमवारी पुन्हा उमरखेडमध्ये अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुसद येथील अली अबरार अहमद उर्फ बबलू इकबाल अहमद याला ९ सप्टेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावरून उमरखेडच्या परवेज खान सलीम खान याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी १२ बोअरची बंदूक जप्त करण्यात आली होती. या दोघांची पोलीस कोठडी घेतल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून काळीदौलत येथील शबीर खान रऊफ खान याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी एक बंदूक, सांबरचे शिंग, बंदुकीचे सुटे भाग, एक १२ बोअर, दोन नळीची बंदूक जप्त करण्यात आली. तसेच पुसद येथील वसंतनगरातील अजहर खान सलीम खान याच्या घराची झडती घेतली असता एक भरमार बंदूकर, एअर रायफलचे पॅलेट, दोन तलवार, एक गुप्ती, दोन खंजर, मोठे चाकू, दोन लहान चाकू, फायटर आढळून आले. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम आणि वन्य प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली.