लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उन्हाळा लागताच अंगाची लाही लाही होऊन घामाच्या धारा वाहायला सुरुवात होते. थंड हवा मिळावी, यासाठी कूलर लावले जातात. उन्हाळ्यात केवळ चार महिने वापरला जाणारा कूलर आठ महिने अडगळीत ठेवलेला असतो. फेब्रुवारी महिना उजाडताच तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातूनच कूलर बाहेर निघताना दिसत आहे.
कूलर थंड हवा देणारे यंत्र असले तरी ते इलेक्ट्रिकवर चालणारे आहे. त्याचा वापर करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. कूलरमध्ये पाण्याचा वापर केला जातो. यामुळे कधी शॉक बसेल, याचा नेम नसतो. हीच बाब लक्षात घेऊन अनेक जण दरवर्षी कूलर लावण्यापूर्वी दुरुस्तीची कामे करून घेतात. तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असली तरी अजूनही पहाटे आणि रात्री थंडी कायम आहे. दिवसभर मात्र उकाड्यामुळे घामाघूम होत आहे. अडगळीत पडलेले घरातील कूलर काढणे सुरू केले.
कूलरला अर्थिंग द्याथंड हवा मिळावी, यासाठी कूलरमध्ये पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे शॉक लागण्याची अधिक शक्यता असते. अशा वेळी कूलरला अर्थिग देणे आवश्यक आहे, तसेच कूलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षीच घडतात. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
मोटार, वायरिंगची तपासणी का करावी ?
- अडगळीत ठेवलेल्या कुलरची • उंदरांकडून वायरिंग कुडतडली जाण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे कूलर सुरू करण्यापूर्वी मोटार आणि वायरिंग सुस्थितीत आहे किंवा नाही, तपासणी गरजेचे आहे.
- उन्हाळा लागताच कूलर दुरुस्तीच्या कामांना वेग येतो. यात मोटार, जाळी, गवत, टप बदलविण्याची कामे होतात. या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
- थंडी गायब होऊन ऊन तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्वेटर कपाटात गेले असून, कूलर बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे.
"कूलर दुरुस्तीची कामे अजून वाढलेली नाही. तापमानात वाढ होताच नागरिक नवीन कूलर खरेदीसाठी किंवा गवत, जाळी, मोटार आदी खरेदीसाठी गर्दी करतात."- यादव रामटेके, यवतमाळ