शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

निवडणुकीसाठी दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By admin | Updated: October 14, 2014 23:25 IST

वणी विधानसभा (७६) या मतदार संघासाठी बुधवारी १५ आॅक्टोबरला एकूण ३०९ मतदान केंद्रावरून मतदान घेतले जाणार आहे़ त्यापैकी केवळ पाच केंद्र संवेदनशील ठरविण्यात आले असून या केंद्रांवर

विनोद ताजने - वणीवणी विधानसभा (७६) या मतदार संघासाठी बुधवारी १५ आॅक्टोबरला एकूण ३०९ मतदान केंद्रावरून मतदान घेतले जाणार आहे़ त्यापैकी केवळ पाच केंद्र संवेदनशील ठरविण्यात आले असून या केंद्रांवर निवडणूक विभागाची विशेष नजर राहणार आहे़वणी विधानसभा मतदार संघात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील मतदारांचा समावेश आहे़ नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा ११ हजार मतदार यावेळी वाढले आहेत़ आता १ लाख ४१ हजार २१४ पुरूष मतदार, तर १ लाख २७ हजार ३२४ महिला मतदार व एक अन्य मतदार असे एकूण २ लाख ६८ हजार ३३९ मतदार आहेत़ निवडणुकीसाठी एकूण २७ झोन पाडण्यात आले आहेत. प्रत्येक झोनमध्ये मतदान केंद्र ठेवण्यात आले आहेत़ एकूण ३०७ मतदान केंद्र व दोन साहाय्यकारी मतदान केंद्र, अशा ३०९ मतदान केंद्रावरून मतदान घेतले जाणार आहेत़ त्यासाठी ३३८ मतदान टीम मंगळवारी रवाना झाल्या आहेत. ३३८ मतदान केंद्राध्यक्ष व १ हजार १४ मतदान अधिकारी तसेच १० महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ यापैकी पाच मतदान केंद्र संवेदनशील गटात मोडणारे आहेत़ वणी शहरातील केंद्र क्रमांक १२६, १२७, १२८ व भालर येथील केंद्र क्रमांक १७९ या केंद्रांवर मतदान ओळखपत्रांची संख्या अत्यल्प असल्याने ते क्रिटिकल ठरविण्यात आले आहेत़ साखरा (को़) केंद्र क्ऱ २९५ हे फॅमिनी लिंकेजअभावी क्रिटिकल ठरविण्यात आले आहेत़मतदान काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सविता तुरेकर व ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी पोलीस यंत्रणा कामाला लावले आहेत़ त्यासाठी सिक्कीम येथील कमांडोंची अतिरिक्त कुमक येथे देण्यात आली आहे़ या तुकडीने विविध भागात पथसंचलन करून वचक निर्माण केला आहे़ शहराबाहेरील प्रत्येक चौकात वाहनांची तपासणी करून पैसा व दारू वितरणावर लगाम लावण्याचा प्रयत्न सुरू आहे़मारेगाव, शिरपूर, मुकुटबन व पाटण येथील ठाणेदारांनीही आपल्या अधिनस्त पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क केले आहेत़ प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस व एक होमगार्ड देण्यात आला आहे. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात पोलिसांची फिरती पथकेही कार्यरत राहणार आहे़