शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राज्यात महामार्ग पोलिसांची आणखी १३ नवी पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:14 IST

राज्यात विविध राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गांवर महामार्ग पोलिसांची ६३ कार्यालये कार्यान्वित आहेत. आता नव्या मंजुरीमुळे त्यात आणखी १३ कार्यालयांची भर पडणार आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या ५७२ जागाही मंजूर, घटक प्रमुख स्तरावर भरती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात विविध राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गांवर महामार्गपोलिसांची ६३ कार्यालये कार्यान्वित आहेत. आता नव्या मंजुरीमुळे त्यात आणखी १३ कार्यालयांची भर पडणार आहे.नव्याने मंजूर १३ महामार्ग कार्यालयांंमध्ये नागपूर-विदर्भ परिक्षेत्रातील सहा पथकांचा समावेश आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर, यवतमाळ ग्रामीण, गडचिरोली, हिंगोली तसेच नांदेडमधील देगलुर ही पथके आहेत. याशिवाय ठाणे ग्रामीण, रायगड, पुणे ग्रामीण, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, नाशिक ग्रामीण, नंदूरबार या जिल्ह्यांमध्येही महामार्ग पथके नव्याने मंजूर केली गेली.

विविध वाहतूक पथकांकरिता २१४४ जागाराज्यात पोलीस शिपाई व चालकांच्या दहा हजार जागांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यापैकी दोन हजार १४४ जागा राज्यातील विविध वाहतूक पथकांकरिता मंजूर करण्यात आल्या आहेत. यातील ५७२ जागा या केवळ महामार्ग सुरक्षा पथकांकरिता मंजूर आहेत. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगांवकर यांनी ८ जुलै रोजी या संबंधीचे आदेश जारी केले आहेत. नव्याने महामार्ग पथके मंजूर झालेल्या संबंधित घटक पोलीस प्रमुखांना या जागा भरण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

एकट्या विदर्भात १६ पथकेमहामार्ग सुरक्षा विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीवर आलेल्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे तेथे नव्या चेहऱ्यांना प्रतिनियुक्ती दिली जाणार आहे. एकट्या विदर्भात १६ पथके आहेत. त्यात आता आणखी सहाची भर पडली आहे.

महामार्ग पथकांंना हक्काच्या जागा नाहीतराज्यात आता ७६ ठिकाणी महामार्ग सुरक्षा पोलिसांची पथके कार्यरत होणार असली तरी यातील बहुतांश पथकांना हक्काची जागा नाही. किरायाच्या खोलीत अनेक कार्यालये सुरू आहेत. प्रत्येक पथक प्रमुखांनी आपल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून शासकीय जागा उपलब्ध करून घ्यावी असे निर्देश अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी अलिकडेच दिले आहेत. अनेक जागांबाबत प्रस्ताव मार्गी लागल्याची माहिती आहे.स्वतंत्र प्रशासकीय अधिकारच नाहीमहामार्ग पोलीस सुरक्षा विभागाला अपर महासंचालक, महानिरीक्षक, अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक ही पदे मंजूर आहेत. परंतु त्यांना स्वतंत्र बजेट, प्रशासकीय अधिकार नाहीत. क्राईम वर्क, परेड ग्राऊंड, कर्मचारी कल्याण, थेट शासकीय अनुदान, पदांची मंजुरी हे सुद्धा नाही. त्यामुळे या पथकांना संबंधित घटक पोलीस प्रमुखांवर अवलंबून राहावे लागते. त्यांचा पगारही तेथूनच निघतो. वाढता व्याप लक्षात घेता महामार्ग सुरक्षा विभागाला सर्वच बाबतीत स्वतंत्र अधिकार देण्याची मागणी केली गेली असून त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्नही होत आहे.विदर्भात १६ महामार्ग सुरक्षा पथके कार्यरत असून त्यात नव्या मंजुरीमुळे आणखी सहाची भर पडली आहे. या सर्व पथकांना कार्यालयासाठी शासकीय पण हक्काची जागा मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. नव्या भरतीत अधिकाधिक जागा नागपूर परिक्षेत्राला मिळविण्याचा प्रयत्न आहे.- संजय शिंतरेपोलीस अधीक्षक (महामार्ग सुरक्षा), नागपूर परिक्षेत्र.

टॅग्स :highwayमहामार्गPoliceपोलिस