शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

ऐन हंगामात बसफेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 9:37 PM

गर्दीचा हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी ‘एसटी’ महामंडळाची धडपड असते. मात्र याला यवतमाळ विभाग अपवाद ठरत आहे. दररोज हजारो किलोमीटर फेऱ्या रद्द केल्या जात आहे. यासाठी कारणांची लांबलचक यादी वाचली जाते. तिकीट मशीन नाही, चालक-वाहक कमी आहे, गाड्या नाही आदी कारणे सांगून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे.

ठळक मुद्दे‘एसटी’चे नुकसान : प्रवाशांचे हाल, कारणांची यादी, गाड्या दुरुस्तीला विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गर्दीचा हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी ‘एसटी’ महामंडळाची धडपड असते. मात्र याला यवतमाळ विभाग अपवाद ठरत आहे. दररोज हजारो किलोमीटर फेऱ्या रद्द केल्या जात आहे. यासाठी कारणांची लांबलचक यादी वाचली जाते. तिकीट मशीन नाही, चालक-वाहक कमी आहे, गाड्या नाही आदी कारणे सांगून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. सोबतच महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.लग्नाचा ठोक असल्याने बसस्थानकावर गर्दी असताना फलाट मात्र रिकामे दिसतात. एखादी बस लागताच लोंढेच्या लोंढे त्या दिशेने धावतात. जागा पकडण्यासाठी रेटारेटी सुरू होते. कुठल्याही मार्गावरील बसची हिच स्थिती आहे. तरीही अतिरिक्त तर दूर नियमित फेºयाही कमी धावत आहे. आगारात अनेक बसेस दुरुस्तीच्या प्रतीक्षेत उभ्या राहतात. बसेस असल्या तरी चालक-वाहक नाही म्हणून तर कधी तिकीट मशीनचा तुटवडा सांगून फेऱ्या रद्द केल्या जातात. चालक-वाहकांना आस्थापना विभागात कामगिरी दिली जाते. काही ठिकाणी तर अनावश्यक मनुष्यबळ वापरले जात असल्याची ओरड कामगारांमध्ये आहे. एका व्यक्तीवर भागणारे काम दोघांना सोपविले जाते. उत्पन्न बुडत असताना अशा कामगारांना बसवर कामगिरी का दिली जात नाही, हा प्रश्न आहे. काही कामगारांवर असलेली वरिष्ठांची मर्जी इतरांची मानसिकता खराब ठरण्यास कारणीभूत ठरत आहे. याच कारणातून चालक-वाहक कामगिरी टाळत असल्याचे सांगितले जाते. जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ आगारातूनच याची सुरुवात होते. इतर आगारांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. टाइमपास प्रकारही मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. याला नियंत्रणात आणण्याची आवश्यकता आहे.अतिकालिक भत्त्यावर उधळपट्टीकमी बेसिकच्या कामगारांना अतिकालिक भत्त्याची कामगिरी देण्याचे महामंडळाचे निर्देश आहे. मात्र यवतमाळ विभागात याउलट सुरू आहे. ३०० ते ३१५ रुपये तास एवढा ओटी घेणाऱ्या कामगारांना अतिरिक्त कामगिरी दिली जात आहे. ९० ते २०० रुपये ओटीच्या कामगारांना मागूनही काम दिले जात नाही. काही कामगारांचा ओटी तर त्यांच्या मासिक वेतनापेक्षाही अधिक जातो, हे वास्तव आहे. यवतमाळ आगारात असलेल्या ८५ पैकी ६० ते ६५ बसेसच उपयोगात येतात. राहिलेल्या बसेस विविध कारणांमुळे आगाराची राखण करतात.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ