शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

ती निघून गेलेली विराणी.. संसार तोलणारी जिंदगानी !

By अविनाश साबापुरे | Updated: May 14, 2024 17:49 IST

Yavatmal : अंकुरच्या कवी संमेलनात मातृशक्तीचा जागर

यवतमाळती कधी भरल्या कुंकवासोबतनिघून गेलेली विराणी असतेसारा संसार खांद्यावर तोलून धरणारी जिंदगानी असतेती कुणाची आई असते...

अशा आशयगर्भ कवितांनी रसिकांना आईची महती पुन्हा एकदा समजावून सांगितली. निमित्त होते अंकुर साहित्य संघाने आयोजित केलेल्या कविसंमेलनाचे आणि औचित्य अर्थातच मातृदिनाचे होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य डाॅ. प्रशांत गावंडे होते. प्रमुख अतिथी प्रसिद्ध गझलकार विनोद बुरबुरे, ज्येष्ठ कवी दिनुभाऊ वानखडे, अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष सुरेश गांजरे, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर शहारे, संयोजक व जिल्हाध्यक्ष विद्या सुनील खडसे, तालुकाध्यक्ष प्रमोद देशपांडे, डॉ. दीपक सव्वालाखे मंचावर उपस्थित होते. कवी संमेलनात अनेक कवींनी आईविषयीची भावना व्यक्त केली. सोनल गादेवार यांनी -

आई तुझ्याचसाठी देवास मी म्हणावे आई तुझी मी होऊन वात्सल्य तुला द्यावे...  

या शब्दातून कृतज्ञता व्यक्त केली. दिनुभाऊ वानखडे यांनी आईतील बाईपण सांगताना - ‘ती कधी भरल्या कुंकवासोबत निघून गेलेली विराणी असते... कधी घरधण्याच्या माघारी सारा संसार आपल्या खांद्यावर तोलून धरणारी जिंदगानी असते... ती कुणाची आई असते...’ अशा ओळी पेश केल्या. प्रिती गोगटे यांनी ‘ऋण फेडता या धरतीचे सारे मिळूनी श्रमू...’ स्मिता भट यांनी ‘मी हिंदोळा, तू अवखळ वारा.. तुझा स्पर्श रेशमी वारा...’ असा आईचा स्पर्श कवितेतून मांडला. तसेच बापाची महती सांगताना मनोहर बडवे  यांनी आपल्या कवितेतून ‘जीवनभर हा धडपडणारा बाप कुणाला कळतो का?’ असा सवाल उपस्थित केला. महेश अडगुलवार, राजश्री बींड, प्रमिला उमरेडकर, तात्याजी राखुंडे, महेश किनगावकर, नितीन धोटे, मंगेश चौधरी, मनोहर बडवे, डॉ. दीपक सव्वालाखे, राजेंद्र फुन्ने, समिना शेख, अरविंद झाडें आदी कविंनी आपल्या रचना सादर केल्या.

विशेष बालकाच्या आईकडून घ्यावी प्रेरणा : डाॅ. गावंडेजेव्हा सामान्य आईला बालकाच्या संगोपणात थकवा येत असेल तर तिने विशेष बालकाच्या आईकडे बघून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन डायटचे प्राचार्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत गावंडे यांनी यावेळी केले. याच कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा अंकुरच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये सुनिता काळे व विलास काळे, बालगायिका गीत बागडे, संजना व प्रशांत बागडे, प्रमोदिनी रामटेके, प्रमिला उमरेडकर, मनोहर शहारे, लालाजी जैस्वाल, राखुंडे आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता शिरभाते आणि कल्पना देशमुख यांनी, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विद्या खडसे तर आभार पल्लवी ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुनिल खडसे, सचिव महेश मोकडे, जिल्हासचिव नितीन धोटे, कोषाध्यक्ष सुरेश राऊत, अल्का राऊत, चंद्रशेखर ठाकरे, तोष्णा मोकडे, पूजा देशपांडे, अर्चना वासेकर, खालिक शेख, साहेबराव ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ