शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सुनील डिवरेंच्या हत्येनंतर तणाव, नागपूर-तुळजापूर मार्गावर गावकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 15:12 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व शिवसेना कार्यकर्ते सुनील डिवरे यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर गावात व आसपासच्या परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

यवतमाळ : तालुक्यातील भांबराजा येथील माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व शिवसेना कार्यकर्ते सुनील डिवरे यांच्या हत्या प्रकरणानंतर परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेचे परिसरात तीव्र पडसाद उमटले असून संतप्त ग्रामस्थांनी नागपूर-तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल २ तास खोळंबली होती.

सुनील डिवरे हे गुरुवारी सायंकाळी घराच्या अंगणात बसलेले असताना पांढऱ्या रंगाच्या ॲक्टीव्हावरून तीन जण आले. त्यापैकी एकाने ॲक्टीव्हा सरळ करून ठेवली. उर्वरित दोघांनी डिवरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. नंतर कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर घाव घातले. काही कळायच्या आत हे हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. यावेळी आरडाओरडा ऐकून डिवरे यांच्या पत्नी अनुप्रिया घरातून अंगणात धावत आल्या. सुनील डिवरे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते.  त्यांना वाहनात टाकून शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आज या घटनेचे तीव्र पडसाद भांबराजा व परिसरात उमटले. संतप्त गावकऱ्यांनी आरोपींच्या तत्काळ अटकेची मागणी करत रस्ता रोको आंदोलन केले, टायरची जाळपोळही करण्यात आली.

पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असली तर अजून काही आरोपी फरार असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. या घटनेमागील नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

परिस्थिती लक्षात घेत शिवसेनेचे दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी सुनील डिवरे यांच्या नातेवाईक, ग्रामस्थ व शिवसैनिकांना फोनवरून आवाहन करीत रास्तारोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले असून एक तासानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

टॅग्स :agitationआंदोलनCrime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेना