शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
5
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
6
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
7
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
8
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
9
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
10
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
11
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
12
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
13
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
14
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
15
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
16
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
17
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
18
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
19
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
20
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका

अमरावतीची पुनसे टोळी निशाण्यावर

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांच्याकडील दरोडा स्टाईल धाडसी घरफोडीप्रकरणी पोलिसांचा

यवतमाळ : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांच्याकडील दरोडा स्टाईल धाडसी घरफोडीप्रकरणी पोलिसांचा अमरावतीमधील वलगावच्या पुनसे टोळीवर संशय आहे. या टोळीने यवतमाळात यापूर्वी अनेक गुन्हे केले असून ते उघडकीसही आले आहे. मांगूळकर यांच्या दर्डानगर स्थित घरी झालेल्या चोरीचा ठोस सुगावा अद्याप पोलिसांना लागलेला नाही. वडगाव रोड, स्थानिक गुन्हे शाखा, एसडीपीओ कार्यालय अशा तिहेरी स्तरावर हा तपास सुरु आहे. खिडकीचे ग्रील काढून चोरी करणाऱ्या दोन टोळ्या आहेत. यातील एक टोळी यवतमाळातीलच एका नगरातील आहे. या टोळीचा म्होरक्या सध्या फरार आहे. तर त्याचे साथीदार कारागृहात आहेत. या फरार म्होरक्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. साथीदार कारागृहात असल्याने या म्होरक्याचा मांगुळकरांकडील चोरीत सहभाग असेल की नाही, याबाबत साशंकता आहे. मात्र तो फरार असल्याने पोलिसांचा संशय वाढला आहे. तो सापडल्यानंतरच त्याच्या टोळीच्या सहभागाचा उलगडा होणार आहे. ग्रील काढून चोरी करणारी दुसरी एक टोळी अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत आहे. दिलीप किसन पुनसे (आमला रोड, वलगाव) हा या टोळीचा म्होरक्या आहे. मात्र त्याचे अनेक साथीदार यवतमाळात आहे. यापूर्वी याच साथीदारांच्या मदतीने त्याने यवतमाळात डझनावर चोऱ्या केल्या आहेत. त्याच्यावर यवतमाळातच सर्वाधिक गुन्हे दाखल आहे. यवतमाळ हेच त्याचे गुन्हेगारीचे कार्यक्षेत्र राहिले आहे. टोळी यवतमाळची आणि टोळी प्रमुख अमरावतीचा असे पोलीस वर्तुळातून त्याच्याबाबत सांगितले जाते. तो नुकताच अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा अधिक संशय आहे. पुनसेवर पोलीस पाळत ठेऊन आहे. त्यानेच हा गेम वाजविला असावा, असा दाट संशय पोलिसांना आहे. पुनसे टोळीला यापूर्वी यवतमाळात अटक झाली आहे. त्याच्याकडून १८ पेक्षा अधिक घरफोड्या डिटेक्ट झाल्या आहेत. पाऊण किलोपेक्षा अधिक सोने व चांदीही जप्त केली गेली. अमरावती शहर व अमरावती ग्रामीणमध्येही त्याने दोन डझनापेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये जप्ती दिली आहे. या टोळीने यवतमाळात मोठ्या घरफोड्या केल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी) चोरीपूर्वी चित्रपटगृहात घेतात चोरटे आश्रय ४पुनसे टोळीची गुन्ह्याची विशिष्ट पद्धत आहे. सायंकाळी ७ वाजता पुनसे व त्याचे साथीदार अमरावतीहून निघतात. रात्री ९ वाजता यवतमाळात आल्यानंतर ते थेट चित्रपटगृहात आश्रय घेतात. तेथे तीन तास चित्रपट पाहिल्यानंतर रात्री १२ वाजतानंतर ते घरफोडीसाठी आपल्या नियोजित भागात जातात. तत्पूर्वी या टोळीच्या येथील साथीदारांकडून आज कोणते घर फोडायचे, याची दिवसभरात ‘झाडी’ केलेली राहते. बंद घर, घरातील सदस्य, कोण किती वाजता येतो, घरातील लाईट किती वाजता बंद होतात, चौकीदार आहे का, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का याची माहिती काढून तयार ठेवली जाते. त्यानंतरच ठरलेल्या घरी गेम वाजविला जातो. पोलिसांवर केला होता हल्ला ४विशेष असे पुनसे टोळीने यापूर्वी एका सहायक पोलीस निरीक्षकाच्या नेतृत्वातील चार सदस्यीय पथकावर हल्लाही केला होता. पहिल्यांदा पकडले असता त्याच्या खिशातून ६० हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. आर्णी रोडवरील एका घरी चोरी करताना पुनसे टोळीने अलार्म सिस्टीमही ब्रेक केली होती. राणाप्रताप गेट परिसरातही या टोळीने चोऱ्या केल्या. या टोळीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.