शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! गुटखा तस्करीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 17:45 IST

गुटख्याची अवैधरित्या तस्करी करण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. आर्णी येथून यवतमाळात गुटखा घेऊन येणारी रुग्णवाहिका ग्रामीण पोलिसांनी आर्णी रोडवर तपासली. तेव्हा हे वास्तव बाहेर आले.

ठळक मुद्देग्रामीण पोलिसांकडून उघड आर्णीवरून यवतमाळ शहरात आणली जात होती खेप

यवतमाळ : गुटखा तस्करीचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. यामधून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. त्यामुळे अनेकांनी या अवैध व्यवसायात पैसा गुंतवला आहे. यातून मिळणारा काळा पैसा पांढरा करणारा वर्गही वेगळाच आहे. दरम्यान, तस्करीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. आर्णी येथून यवतमाळात गुटखा घेऊन येणारी रुग्णवाहिका ग्रामीण पोलिसांनी आर्णी रोडवर तपासली. तेव्हा हे वास्तव बाहेर आले.

आर्णी येथून एमएच-२९ - टी-३२५६ क्रमांकाची रुग्णवाहिका यवतमाळकडे निघाली. शहरालगतच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आर्णी मार्गावर ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीवरून ही रुग्णवाहिका थांबविली. मंगळवारी रात्री या रुग्णवाहिकेची पोलिसांनी झडती घेतली. त्यामध्ये सीटच्या खाली गुटख्याची तीन पोती दडविलेली आढळून आली. त्यानंतर रुग्णवाहिकेतील प्रदीप थावरा राठोड (२७), सय्यद रहेमान सय्यद उमर (२४), रुग्णवाहिकेचा चालक अनिल डुड्डेकर (२३) (तिघे रा. अमराईपुरा आर्णी) यांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी अन्न निरीक्षक घनश्याम दंदे यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्यातील २६ (२), २७, ३० (२) (ए) ५९ या कलमानुसार ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात जमादार कैलास लोथे, संदीप मेहेत्रे, रुपेश नेवारे, विक्की राऊत, जांभुळकर आदींनी केली.

आर्णी गुटख्याचे बनले केंद्र

लगतच्या तेलंगणा राज्यातून प्रतिबंधित गुटखा आणला जातो. आर्णीत गुटखा साठविण्याचे मोठे गोदाम आहे. २१ नोव्हेंबरला पारवा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने १० लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त केला होता. त्या गुन्ह्यातील सलीम शेख गफूर, महेबूब शेख सादीक हे दोघे पसार झाले होते. आर्णीतूनच यवतमाळ, अमरावती, वाशिम, नागपूर या ठिकाणी गुटखा पाठविला जातो. विशेष करून किराणा मालाच्या आडून गुटख्याची तस्करी करण्यात येते. हे मोठे रॅकेट अजूनही पोलिसांना उघड करता आले नाही. या व्यवसायातील व्हाईट कॉलर गुन्हेगार पोलीस कारवाईपासून दूर आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यTobacco Banतंबाखू बंदी