शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

सव्वा लाखांवर एसटी कामगारांना वेतनवाढ तडजोड बैठकीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 21:40 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सव्वा लाख कामगारांना वेतनवाढ तडजोडीच्या बैठकीची प्रतीक्षा आहे. वेतन करारावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कामगार संघटनेने महामंडळ अध्यक्ष तथा परिवहनमंत्र्यांना जून महिन्यात पत्र दिले आहे.

ठळक मुद्देवेतन करारावर स्वाक्षरीच नाही । तोडगा काढण्यासाठी कामगार संघटनेचे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सव्वा लाख कामगारांना वेतनवाढ तडजोडीच्या बैठकीची प्रतीक्षा आहे. वेतन करारावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कामगार संघटनेने महामंडळ अध्यक्ष तथा परिवहनमंत्र्यांना जून महिन्यात पत्र दिले आहे. यावरून दीड महिन्याचा कालावधी लोटला. अद्याप तरी संघटनेला यासाठीचे निमंत्रण मिळालेले नाही.सन २०१६ ते २०२० या चार वर्षांच्या वेतन करारासाठी जून २०१८ मध्ये चार हजार ८४९ कोटींची घोषणा करण्यात आली. रकमेच्या वितरणासाठी एसटी प्रशासनाने सूत्र दिले. जाहीर केलेल्या रकमेतून सूत्रानुसार कामगारांना पूर्ण रकमेचे वाटप होत नाही, असे कामगार संघटनेने सांगितले होते. कामगार करारावर स्वाक्षरीही करण्यात आली नाही. दरम्यान, ९ जून २०१८ रोजी झालेल्या बैठकीत चार हजार ८४९ कोटींमध्येच वेतनवाढीचा प्रस्ताव सादर करा, असा निर्णय परिवहनमंत्र्यांनी दिला होता. यानुसार संघटनेने प्रस्ताव सादर केला. त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना वार्षिक वेतनवाढ व घरभाडे भत्त्याचा जो दर लागू होईल, तोच दर एसटी कामगारांना लागू केला जाईल, असे महामंडळ अध्यक्षांनी जाहीर केले होते. केरळ दुष्काळग्रस्तांना मदतीसंदर्भात झालेल्या श्रमिक संघटनांच्या बैठकप्रसंगी कनिष्ठ वेतनश्रेणी व तीन वर्षांपेक्षा अधिक आणि पाच वर्षांपेक्षा कमी सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना चार अतिरिक्त वेतनवाढ दिली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. यामुळे महामंडळावर पडणारा आर्थिक भार चार हजार ८४९ कोटींमध्येच धरला जाणार असल्याने संघटनेने दिलेल्या प्रस्तावात काही प्रमाणात घट होऊ शकते, असे गृहित धरले. दरम्यान, वेतनवाढीच्या प्रस्तावावर तडजोडीस तयार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. संघटना तडजोडीस तयार आहे, मात्र महामंडळाकडून कुठलाही प्रतिसाद नसल्याचा आरोप होत आहे. या सर्व प्रकारात वेतवाढीची कोंडी होत आहे.महागाई भत्ता जुलैपासून लागू कराशासन निर्णयानुसार एसटी कामगारांना १ जानेवारी २०१९ पासून वाढीव तीन टक्के महागाई भत्ता लागू करा. जुलैच्या वेतनासोबत ही रक्कम देण्यात यावी, असे पत्र महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांना कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिले आहे. यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण कामगारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :state transportएसटी