शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीविरोधात सर्व नगरसेवकांची एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:06 IST

हद्दवाढीने तीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या भागातील नागरिकांवर चुकीच्या प्रक्रियेने मालमत्ता कर आकारणी करण्यात आली. याविरोधात यवतमाळ नगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले आहेत.

ठळक मुद्देहद्दवाढ क्षेत्र : उमरसरा, वडगाव, पिंपळगाव, वाघापूर, लोहारा, भोसा, मोहाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हद्दवाढीने तीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या भागातील नागरिकांवर चुकीच्या प्रक्रियेने मालमत्ता कर आकारणी करण्यात आली. याविरोधात यवतमाळ नगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले आहेत. त्यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याची मागणी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.उमरसरा, वडगाव, पिंपळगाव, वाघापूर, लोहारा, भोसा, मोहा या ग्रामपंचायती तीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेत समाविष्ट झाल्या. या भागासाठी नगरपरिषदेने वाढीव मालमत्ता कराची आकारणी केली. सदर प्रकरण जिल्हाधिकाºयांकडे कलम ३०८ अंतर्गत न्यायासाठी प्रलंबित आहे. या अपिल प्रकरणात कुठलीही बाधा न येता सदर भागातील मालमत्ता कर आकारणी वसुली मोहिमेला गती मिळावी यासाठी विशेष सभा घ्यावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिवाय सभेच्यादृष्टीने विषय पत्रिकेवर कुठले विषय घेतले जावे, हेही सूचविण्यात आले आहे.हद्दवाढ आणि मूळ हद्दीतील नागरिकांवर मालमत्ता कर आकारणीसाठी लावलेला दंड आणि इतर आकारणी शुल्क रकमेत सूट मिळावी, शासनाच्या विविध योजनांतर्गत मिळणारे अनुदान, निधी, मालमत्ता कर, बाजार कर आणि इतर प्राप्त उत्पन्न तसेच पालिकेच्या विविध कामासाठी होणाºया खर्चाचा तपशील प्रत्येक महिन्याच्या सर्वसाधारण सभेत लेखी स्वरूपात सादर व्हावा, पालिकेच्या प्रत्येक विभागातील कार्यसूची कर्मचाºयांच्या नावासह दर्शनी भागावर लावली जावी, वाहनतळावर येणाºया नागरिकांना आणि नगरसेवकांच्या कामाबाबत माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष आदी बाबींवर या सभेमध्ये विचारविनिमय व्हावा, असे यात नमूद करण्यात आले आहे. माजी आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांनी ही माहिती कळविली आहे.सैनिकांना करातून सूट द्यावीनगरपरिषदेच्या मालमत्ता करातून सूट देऊन सैनिकांच्या देशसेवेचा गौरव व्हावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सैनिक, माजी सैनिक, सैनिक विधवा, स्वातंत्र्य सैनिकांना मालमत्ता करातून सूट मिळावी यासाठी बैठकीत विचारविनिमय व्हावा, असे म्हटले आहे.ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळहद्दवाढ क्षेत्रातील मनरेगा योजनेंतर्गत नोंदणीकृत झालेल्या जॉबकार्डधारकांची संख्या १२ हजार ५५९ एवढी आहे. या मजुरांवर आणि ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना ‘क’ वर्ग नगरपरिषदेप्रमाणे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाºयांमार्फत नागपूर आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला जावा, असे सूचविण्यात आले आहे.

टॅग्स :Taxकर