शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात दारू विक्रेत्याचा मृत्यू; नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप, पोलिसांकडून नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:23 IST

गावात दारू विक्री करणाऱ्या युवकाचा पोलिसांनी पाठलाग करून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना पारवा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या इचोरा गावात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपत्नी व नातेवाईकांचा आक्रोशठाणेदार म्हणतात, एसडीपीओ पथकाची संयुक्त कारवाई

हरिओम बघेलयवतमाळ : गावात दारू विक्री करणाऱ्या युवकाचा पोलिसांनी पाठलाग करून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना पारवा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या इचोरा गावात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.महेंद्र देवराव गायकवाड (३५) रा. इचोरा ता. आर्णी असे मृताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी पोलिसांचे एक पथक सावळी सदोबा परिसरातील इचोरा गावात दारू पकडण्यासाठी आले होते. महेंद्रच्या घरीसुद्धा दारू विकली जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्यामुळे या पथकाने त्याच्या घराकडे मोर्चा वळविला. पोलीस आल्याची कुणकुण लागताच महेंद्र गावात पळत सुटला. पोलिसांनीही त्याचा बराच दूर पाठलाग केला. मात्र तो पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी त्याला जबर मारहाण केली. यावेळी बेशुद्ध झालेल्या महेंद्रला आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांच्या मारहाणीमुळे महेंद्रचा गावातच जागीच मृत्यू झाला होता, त्याच्या मृत्यूस पोलीसच जबाबदार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महेंद्रची पत्नी विद्या गायकवाड हिने केली आहे. महेंद्रला मृत घोषित करताच त्याचे कुटुंबीय व नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर एकच आक्रोश केला. महेंद्रच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.महेंद्रवर दारूच्या अनेक केसेस - ठाणेदार चौधरसदर प्रतिनिधीने, संबंधित पारवा पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्याशी संपर्क साधला असता, पांढरकवडा, घाटंजी व पारवा पोलीस ठाण्या हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची दारू, जुगाराविरुद्ध संयुक्त कारवाई केली जात होती, असे त्यांनी सांगितले. महेंद्रवर यापूर्वी अनेकदा दारूच्या केसेस दाखल करण्यात आल्या. परंतु प्रत्येक वेळी तो पळून जात होता. मंगळवारीसुद्धा तो पळून गेला. मात्र त्याला पोलिसांनी कोणत्याही प्रकारची मारहाण केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ठाणेदार चौधर यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस