शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्र्यांनी घेतली चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाशी साधला संवाद

By विशाल सोनटक्के | Updated: August 19, 2023 21:36 IST

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका भावनिक प्रसंगाला सामोरे जावे लागले. मनोज राठोड या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला चार मुली आहेत. या कुटुंबाची व्यथा ऐकल्यानंतर मुंडे यांनी या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. 

यवतमाळ - जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका भावनिक प्रसंगाला सामोरे जावे लागले. मनोज राठोड या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला चार मुली आहेत. या कुटुंबाची व्यथा ऐकल्यानंतर मुंडे यांनी या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील येरद येथील मनोज राठोड व महागाव तालुक्यातील तिवरंग येथील नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांचे कुटुंबीय धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी यवतमाळ येथे आले होते. या दोन्ही कुटुंबांनी घरातील कर्ता पुरुषाच्या निधनानंतर कुटुंबावर ओढवलेली परिस्थिती मांडली. यावेळी या भगिनींना रडू कोसळले होते.

घरातील कर्ता शेतकरी पुरुष गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार, असा प्रश्न विचारत ती भगिनी धाय मोकलून रडू लागली. त्यात शासनाची मिळणारी मदतही अद्याप मिळाली नसल्याचे तिने सांगितले. ही माहिती ऐकताच कृषिमंत्री मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना तत्काळ फोन लावून या दोनही कुटुंबांना अर्थसहाय्य करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर मनोज राठोड या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या चार मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मी स्वत: घेत असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर कुटुंबापुढील प्रश्न आणखी जटील होतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार करून कुठल्याही शेतकरी बांधवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे उघडे आहेत, असे भावनिक आवाहनही मुंडे यांनी यावेळी केले.

टॅग्स :YavatmalयवतमाळDhananjay Mundeधनंजय मुंडे