शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

खाणीतील ब्लास्टिंगमुळे शेती संकटात

By admin | Updated: December 29, 2014 02:13 IST

येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अडेगाव शिवारात डोलोमाईट कंपन्याचे बस्तान असून कंपन्याच्या निघणाऱ्या धुरामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे़ ...

मुकुटबन : येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अडेगाव शिवारात डोलोमाईट कंपन्याचे बस्तान असून कंपन्याच्या निघणाऱ्या धुरामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे़ त्यामुळे पिकावर परिणाम होत आहे़ त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी परिसरातील असलेल्या डोलोमाईटच्या कंपन्या बंद करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यासह आमदारांना निवेदनाद्वारे कळविले आहे़ न्याय न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशारासुध्दा दिला आहे़सध्या अडेगाव शिवारात आयुषी मिनरल्स, ईशान गोल्ड, गुंडावार माईन्स अशा नावाच्या तीन डोलोमाईटच्या कंपन्या कार्यरत आहे़ कंपन्याच्या सभोवताल शेतकऱ्यांच्या शेती आहे़ सदरच्या कंपन्यामधून निघत असलेल्या धुरामुळे शेतातील पिकावर धूर व कण साचून पिकांचे फार मोठे नुकसान होत आहे़ त्याचप्रमाणे या धुराच्या कणांमुळे आजुबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांना प्रदूषणामुळे त्वचारोग, दमासारखे आजारही होत आहे़ या तिनही कंपनीत जमिनीतील खनिज काढण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात येते़ ही ब्लास्टिंग ठरवलेल्या वेळात होत नसून वेळीअवेळी होणाऱ्या ब्लास्टींगमुळे दगडाचे लहान-मोठे तुकडे उंचावरून कंपन्या लगत असलेल्या शेतातील शेतकरी मजुरदार व पिकांवर पडतात़ त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या जीवास धोका होत आहे़ विशेष म्हणजे ब्लास्टिंगच्या वेळी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या शेतकऱ्यांना ब्लास्टिंग होतपर्यंत वाट पाहावी लागतात़ याबाबत शेतकरी मुरलीधर बेलेकर यांनी २२ नोव्हेंबर २०१४ ला दुपारी ४़३० वाजताच्या दरम्यान ब्लास्टिंग थांबविले. त्यावरून कंपनीने या शेतकऱ्याविरूद्ध मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार केली़ तक्रारीवरून शेतकरी मुरलीधर बेलेकर यांच्यावर कामात अडथळा केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला़ सध्या तरी मुकुटबन व अडेगाव शिवारात असलेल्या विविध कंपन्यांनी दादागिरी सुरू केली असून वेळीच यांना आळा न घातल्यास भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामास शेतकऱ्यांना बळी पडावे लागणार आहे़ याबाबत अडेगाव येथील शेतकऱ्यांनी कंपनीला वेळोवेळी निवेदनाद्वारे कळविले आहे़ कंपनीने शेतकऱ्यांच्या मागण्याला केराची टोपली दाखविली आहे़ झालेल्या नुकसानीची मागणी केली असून त्याचबरोबर ब्लास्टिंग बंद करून कंपन्या बंद करण्याबाबतचे निवेदन आमदार बोदकुरवार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी केळापूर, पोलीस स्टेशन मुकुटबन, तलाठी अडेगाव, आयुष मिनरल, ग्रामपंचायत अडेगाव, इशान गोल्ड, गुंडावार माईन्स यांना दिले आहे़न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालय झरीसमोर न्याय मिळेपर्यंत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे़ यामध्ये शेतकरी शंकर क्षीरसागर, मुर्लीधर क्षीरसागर, देवराव क्षीरसागर, नवनाथ क्षीरसागर, रामचंद्र दुरडकर, शिवशंकर दुरडकर, शामराव दुरडकर, पुंडलीक बेलेकर, किसन बेलेकर, मंगल बेलेकर, जितेंद्र बेलेकर यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत़ (शहर प्रतिनिधी)