शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमालाचे दर गडगडले; शेतकऱ्यांत वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:26 IST

Yavatmal : लागवड खर्च निघणेही झाले आहे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : बाजारपेठेत शेतीमालाची आवक कमी-जास्त होत असताना शेतीमालाचे दर मात्र स्थिरावत नाहीत. तूर, हरभरा, हळद आदींनाही दर कमी मिळत आहे. दिवसेंदिवस दर कमी होत चालल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. मिळणाऱ्या मोबदल्यातून नफा सोडाच, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

सद्यःस्थितीत उत्पन्न कमी आणि पिकांचे दरही गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. पाच महिन्यांपूर्वी तुरीने नऊ हजारांचा पल्ला गाठला होता. हरभराही पाच हजार ६०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. सोयाबीनची 'नाफेड' मार्फत चार हजार ८९२ हमीभावाने खरेदी होती. हळदही १४ हजारांपर्यंत जात होती. फेब्रुवारी महिन्यात नाफेड खरेदी बंद होताच सोयाबीनचे भाव तीन हजार ८५० रुपये झाले. अनेकांनी भाववाढीच्या अपेक्षेने सोयाबिन विकले नव्हते. तूर सहा हजार रुपये जात आहे. हळदीला नऊ हजार ते १२ हजारांचा दर मिळत आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

  • नाफेडवर व्यापाऱ्यांचा शेतीमाल शेतकऱ्यांच्या नावाने तोलला गेला. शेतकऱ्यांचे सोयाबीन मागेच राहिले. सध्या बाजारात सोयाबीनला तीन हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मिळणाऱ्या अल्पदरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
  • त्यामुळे प्रतिक्विंटल ९९२ 3 रुपयांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतीमाल शेतकऱ्यांच्या जवळ असताना त्यास दर मिळत नाही.

दरवाढीचा फायदा नाहीशेतीमाल दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना झालाच नाही. व्यापारी नेहमी फायद्यात राहिले आहेत. सध्या सर्वच शेतीमालाचे दर गडगडले आहेत. जवळ असलेले सोयाबीन, तूर, हळद, हरभरा विक्री करावा की ठेवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रYavatmalयवतमाळ