लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : काँग्रेसतर्फे तालुक्यातील मुरली (बंदर) येथील गावकºयांना साखर वाटप करून राज्य शासनाने साखर न वाटपाचा जो निर्णय घेतला त्याचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले.ऐन सणासुदीच्या काळात गरजू व्यक्तींना साखर न वाटण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे निराधारांच्या तोंडातला घास हिसकावल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सरकाराच्या निषेधार्थ हे आंदोलन केले गेले. यावेळी संपूर्ण गावातील नागरिकांना सोबत सरकाराच्या चुकीच्या ध्येय धोरणाविषयी व सरकार गोरगरीबांची कशा पद्धतीने फसवणूक करीत आहे या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.आता राज्य शासनाला त्यांनी जो साखरी संदर्भात चुकीचा निर्णय घेतला आहे त्याच्या विरोधात चटनीमिठाचे लाडू करून पाठवून आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस तर्फे देण्यात आला.हे आंदोलन युवानेते जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय कडू, गौतम चौधरी, अण्णाजी ढगले, लक्ष्मणराव चौधरी, माणिकराव मेश्राम, सुभाष गोडे, राजू चौधरी, राजू वातीले, अरविंद चौधरी, ताकसांडे भाऊ, विष्णू कोवे, गणेश उन्नरकर, ओंकार जिद्देवार, दशरथ मोहुर्ले, सुनील हुड, संतोष अक्कलवार, अनिल आडे, जैता आडे, यादवराव गोडे, विनोद बेले, रमेश गैजिक, विशाल एकोणवार, आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसतर्फे साखर वाटप करून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:15 IST
काँग्रेसतर्फे तालुक्यातील मुरली (बंदर) येथील गावकºयांना साखर वाटप करून राज्य शासनाने साखर न वाटपाचा जो निर्णय घेतला त्याचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसतर्फे साखर वाटप करून आंदोलन
ठळक मुद्देराज्य शासनाने साखर न वाटपाचा जो निर्णय घेतला त्याचा निषेध करीत आंदोलन