रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वयाची पंचाहत्तरी गाठणारे गृहस्थ एकतर रूग्णालयात असतात, नाहीतर घरी आरामखुर्चीत असतात. मात्र यवतमाळातील उमेश वैद्य हे सद्गृहस्थ आजन्म सायकल चालवत आले आहेत. विशेष म्हणजे, या वयातही ते सायकल चालवितात. आरोग्य समृद्धीकरिता त्याचा त्यांना उत्तम लाभही झाला आहे. त्यांचे दात आजही मजबूत आहेत. नजर पारखी आहे. पचनक्रियाही उत्तम आहे.पोस्टल ग्राउंडलगत वास्तव्याला असलेले उमेश दामोधर वैद्य हे पेशाने शिक्षक आहेत. स्थानिक विवेकानंद विद्यालयात त्यांनी ३८ वर्षे नोकरी केली. पाचवी ते दहावीपर्यंत भाषा विषय त्यांनी शिकविला. गुरूजींनी अनेक आदर्श प्रथम आपल्या जीवनात उतरविले. नंतर विद्यार्थ्यांना उपदेश दिला. या कार्यातील सातत्य आजही त्यांनी जपले आहे.१९६४ मध्ये वैद्य नोकरीवर लागले. त्यानंतर सात वर्षांनी सायकल विकत घेतली. हवा भरण्याचा पंपही खरेदी केला. त्यावेळी खरेदी केलेली सायकल आजही ते चालवित आहेत. विशेष म्हणजे, सरांना दुचाकी वाहन चालविता येते. वाहनाच्या माध्यमातून होणारे प्रदूषण भयंकर आहे. यामुळे त्यांनी परिस्थिती सुधारल्यानंतरही वाहन चालविले नाही.आज त्यांचा मुलगा आनंद आणि सुनबाई चांगल्या कंपनीत नोकरीवर आहे. मुलाने विदेशातही अनेक वर्षे नोकरी केली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सायकल न चालविण्याचा आग्रह केला. मात्र गुरूजींनी सायकल सोडली नाही. पूर्वी ते दररोज २५ किमी सायकल चालवत होते. इतकेच नव्हेतर, शेतावरही सायकलनेच जात होते. आपल्या अर्धांगिणीलाही सायकलवरच नेत होते. आजही ते सायकलनेच व्याख्यानाला जातात.गाडी माझी पेट्रोल तुझे!गुरूजींच्या मुलाने महाविद्यालयात प्रवेश घेताच गाडीचा हट्ट धरला. त्याला सायकल नको होती. यावर गुरूजी त्याला म्हणाले, तू म्हणशील ती गाडी मी तुला घेऊन देतो. पण एकच अट आहे. गाडी माझी राहील आणि पेट्रोल तुझे असेल. मंजूर असले तर हो म्हण. मुलाने सायकलच पसंत केली. यामुळे आज मुलाला शिस्त असल्याचे गुरूजी सांगतात.अलीकडे पालक विद्यार्थ्यांना गाड्या घेऊन देतात. यातून मुले वडिलाच्या कमाईची उधळपट्टी करतात. खरेतर मुलांना चालू द्यावे. सायकलमुळे व्यायामही होतो.- उमेश वैद्य,निवृत्त शिक्षक
वयाच्या पंचाहत्तरीत गुरुजी सायकलवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:27 IST
वयाची पंचाहत्तरी गाठणारे गृहस्थ एकतर रूग्णालयात असतात, नाहीतर घरी आरामखुर्चीत असतात. मात्र यवतमाळातील उमेश वैद्य हे सद्गृहस्थ आजन्म सायकल चालवत आले आहेत. विशेष म्हणजे, या वयातही ते सायकल चालवितात. आरोग्य समृद्धीकरिता त्याचा त्यांना उत्तम लाभही झाला आहे.
वयाच्या पंचाहत्तरीत गुरुजी सायकलवरच
ठळक मुद्देउमेश वैद्य । मजबूत दात, पारखी नजर