शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

टेक्नोसॅव्ही युवा अध्यक्षाचे कौतुकास्पद पाऊल; कलगाव या लहानशा गावात सुरू आहे संपूर्णपणे ऑनलाईन शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:21 IST

मोबाईल तंत्रज्ञानाची आवड असलेले सादीकभाई शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बहुमोल योगदान देत आहेत.

ठळक मुद्देशाळेचे स्वत:चे युट्यूब चॅनेल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: दिग्रस तालुक्यातील कलगाव येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महंमद सादीक महंमद साबीर हे सध्या चर्चेचा विषय झाले आहेत. कोरोनाच्या अचानक आलेल्या संकटात मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सादिक यांनी गावातील १७० मुलांशी स्वत: संपर्क केला. त्यांचे मोबाईल क्रमांक मिळवले. व्हाट्स आप ग्रुप तयार केले. ते स्वत: प्रत्येक ग्रुपचे अ‍ॅडमिन झाले. या ग्रुपशी शिक्षकांना जोडून त्यांनी मुलांचे शिक्षण सुरू केले. ग्रुपवरील प्रत्येक कृती आणि प्रतिसादावर त्यांची नजर असते. मुलांना मार्गदर्शक असे व्हिडीओ, इमेज, टेक्स्ट ते ग्रुपवर शेअर करतात.

२०१९ - २० या शैक्षणिक वर्षात ते जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, कलगावच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवडून आले. आजच्या घडीला ते कार्यकुशल व तंत्रस्नेही अध्यक्ष म्हणून यशस्वी ठरले आहेत.मोबाईल तंत्रज्ञानाची आवड असलेले सादीकभाई शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बहुमोल योगदान देत आहेत.शाळेत घेतल्या जाणाऱ्या सर्वच शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम व कार्यक्रम तसेच दैनंदिन अध्यापनाच्या आकर्षक व्हिडिओ क्लिप ते स्वत: तयार करतात. युट्युब चॅनेलवर त्या प्रसारित करतात. त्यासाठी त्यांनी शाळेचे युट्युब चॅनेलही सुरू केले आहे. शाळेचे युट्युब चॅनेल चालविणारे ते राज्यातील एकमेव अध्यक्ष असावेत, हे इथे उल्लेखनीय!!मुलांची व शिक्षकांची ऑनलाईन हजेरी हा सुध्दा त्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम! यात ते मुलांची व शिक्षकांची दररोजची हजेरी नोंदवतात. हजेरीच्या पीडीएफ तयार करून ते केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांना नियमितपणे पाठवतात. त्यांच्या तंत्रस्नेही असल्याचा फायदा शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व गावातील पालकांना होतो आहे. मुलांच्या शिष्यवृत्ती जमा झाल्या किंवा नाही हे पाहणे, नवीन शैक्षणिक अपडेट पालक व मुलांपर्यंत पोचविणे अशी कामे सुद्धा ते कुठलाही कंटाळा न करता अतिशय उत्साहाने करतात.त्यांच्या या धडपडीचे शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, डॉ. सुचिता पाटेकर यांनी कौतुक केले आहे.चार कॉन्व्हेंटच्या मुलांचा मराठी शाळेत प्रवेश!महंमद सादिक यांच्या विशेष प्रयत्नाने कॉन्व्हेंटमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षण घेतलेली चार मुले मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यास तयार झाली आहेत.शेख आसिर, ओवेज पठान, जोया पारेख आणि आयान बेग या मुलांनी इंग्रजी किंवा गावातील उर्दू शाळेत प्रवेश न घेता मराठी शाळा जवळ केली आहे. शाळेचा पट वाढविण्यासाठी सुद्धा त्यांचे मोठे सहकार्य शाळेला मिळत आहे.

टॅग्स :Schoolशाळाtechnologyतंत्रज्ञान