लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : एकीकडे दररोज पांढरकवडा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे शहरात राजकीय स्टंटबाजीला उधाण आले.सोमवारी सकाळी कै.वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी अचानक रस्त्यावर उतरून ज्या परिसरातील रुग्णांनी कोरोनावर मात केली, त्या परिसरातील प्रतिबंधीत क्षेत्र हटविण्यात यावे, अशी मागणी करत रस्त्यावर ठिय्या दिला. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढा देणारे प्रशासन हतबल झाले.रविवारी रात्री मेन लाईन परिसरातील प्रतिबंधीत क्षेत्रासाठी लावलेले कठडे काढत असतानाचा एक व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल झालेत. त्यात किशोर तिवारी दिसतात. याबाबत त्यांना विचारणा केली असता, आपण कोणतेही कठडे काढले नाहीत. नगरपालिकेच्या कंत्राटदाराने ते कठडे काढलेत, असे ते म्हणाले. सोमवारी सकाळी पुन्हा ते कठडे पूर्ववत लावण्यात आले. त्यानंतर सकाळी १० वाजतापासून स्थानिक बिरसा मुंडा चौकात किशोर तिवारी यांनी एका चादरीवर झोपून ठिय्या आंदोलन सुरू केले. स्थानिक प्रशासनाची मनमानी सुरू असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना पायदळी तुडविल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या परिसरात कोरोना रुग्णच नाही, त्या परिसरातील प्रतिबंधीत क्षेत्र हटवावे, अशी त्यांची मागणी आहे. अकारण लोक या क्षेत्रात अडकून पडले असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने व्यावसायिक अडचणीत आले असल्याचे तिवारी यांचे म्हणणे आहे. सायंकाळी ४ वाजतानंतरही त्यांचे आंदोलन सुरूच होते. यासंदर्भात ठाणेदार महल्ले यांच्याशी संपर्क साधला असता, चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर तहसीलदारांनी बैठकीत असल्याचे सांगितले.
राजकीय स्टंटबाजीमुळे प्रशासन हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST
रविवारी रात्री मेन लाईन परिसरातील प्रतिबंधीत क्षेत्रासाठी लावलेले कठडे काढत असतानाचा एक व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल झालेत. त्यात किशोर तिवारी दिसतात. याबाबत त्यांना विचारणा केली असता, आपण कोणतेही कठडे काढले नाहीत. नगरपालिकेच्या कंत्राटदाराने ते कठडे काढलेत, असे ते म्हणाले. सोमवारी सकाळी पुन्हा ते कठडे पूर्ववत लावण्यात आले.
राजकीय स्टंटबाजीमुळे प्रशासन हतबल
ठळक मुद्देरस्त्यावर ठिय्या : कंटेन्टमेंट झोनच्या विरोधात किशोर तिवांरीचे पांढरकवडात आंदोलन