शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खातेदारांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट; कार्पोरेट मंत्रालय आले ॲक्शन मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:31 IST

'जनसंघर्ष'तील ४४ कोटींच्या अपहाराचे प्रकरण : कारवाईच्या हालचाली सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीतील ४४ कोटींच्या अपहार प्रकरणात कार्पोरेट कार्य मंत्रालय अॅक्शन मोडवर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहे. यामुळे कार्पोरेट मंत्रालय नेमके काय निर्देश देते, याकडे खातेदारांचे लक्ष लागले आहे.

यवतमाळ व वाशीम जिल्ह्यांतील सहा हजार २०० खातेदारांना प्रणीत मोरेसह दहा संचालक मंडळाने गंडा घातला. त्यानंतर खातेदारांनी पैसे परत मिळावे, अशी मागणी प्रशासनाकडे लावून धरली. पोलिसांनी अपहारातील सर्व आरोपींना अटक केली आहे. मात्र, कायदेशीर कारवाईच्या दृष्टीने प्रशासनाकडून या प्रकरणातील प्रत्येक बारकावे शोधून काढले जात आहे. जनसंघर्ष अर्बन निधी केंद्र शासनाच्या कार्पोरेट कार्य मंत्रालयाच्या अखत्यारित येते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून अपहाराची माहिती दिली होती.

त्यानंतर कार्पोरेट कार्य मंत्रालयाने संस्थेवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. संस्थेवर प्रशासक नेमले जावे, अशी मागणी खातेदारांची आहे. त्यामुळे कार्पोरेट मंत्रालय ठेवीदारांना न्याय देण्यासाठी काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

अवसायक नेमणार कधी? बँकेकडे कर्जदाराचे सोने आहेत. यासोबतच इतर कर्जदारांची मालमत्ताही तारण ठेवलेली आहे. यातून ठेवीदारांना परतफेड करता येऊ शकते. त्यासाठी अवसायक नेमण्याची मागणी आहे.

खातेदारांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे १ जनसंघर्ष अर्बन निधीतील खातेदारांनी आज रविवार, १९ जानेवारीला नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. आरोपी संचालकांची संपत्ती जप्त करून ६ हजार २०० खातेदारांचे ४४ कोटी परत करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देतेवेळी गिरीश तापडीया, गणेश चिस्तळकर, संदीप हेडा, दिलीप डहाके, जयंत राजुरकर, चेतन लोढीया, सागर शर्मा, राम राऊत, मयूर देशमुख, मंगेश तिडके आदी उपस्थित होते.

"दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीतील अपहाराची माहिती कार्पोरेट मंत्रालयाला कळविली आहे. त्यांनी या प्रकरणात कारवाई सुरू केली आहे." - डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी,

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीYavatmalयवतमाळ