शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

मारेगावात नियम न पाळल्यानेच वाढताहेत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

शहरातील रस्त्यावर वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली होतानाचे चित्र दररोज दृष्टीस पडते. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपण नियम तोडले तर आपल्यावर कायदेशीर कार्यवाही होते, ही भावनाच आता सर्वसामान्यातून लोप पावत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा बोथट बनली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । वाहतूक शाखेच्या कारवाईची गरज, मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले

देवेंद्र पोल्हे ।लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शहरातील रस्त्यांवर व ग्रामीण भागात धावणाऱ्या अनेक वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. या वाहनचालकांत अप्रशिक्षीत अल्पवयीन मुले, मद्यपी आणी ंविनापरवानाधारक यांचा सहभाग मोठा आहे. मद्यपान करून वेगात वाहने चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम मोडणे, अशा वाहनचालकांवर आवश्यक त्या प्रमाणात कार्यवाही होत नसल्याने वाहतुकीचे नियम पायदळी तुडविण्याचे प्रमाण वाढले आहे.शहरातील रस्त्यावर वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली होतानाचे चित्र दररोज दृष्टीस पडते. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपण नियम तोडले तर आपल्यावर कायदेशीर कार्यवाही होते, ही भावनाच आता सर्वसामान्यातून लोप पावत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा बोथट बनली आहे. वणी उपविभागात मारेगाव तालुक्यात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. सातत्याने अपघात होऊन अनेकांचे प्राण जात आहेत. बºयाच अपघातात मद्यपान करून वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणे, ही कारणे सातत्याने समोर येत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी तर दिवसभर शहरात पदोपदी वाहतूक नियम तोडले जात आहेत. अपघात घडून मृत्यू झाल्यावर यंत्रणेपासून सर्वजण हळहळ व्यक्त करतात. परंतु अपघाताची जबाबदारी कोणीच स्विकारायला तयार नाही. वाहनधारकांना आणि नागरिकांना यंत्रणेला दोष देऊन प्रत्येकजण आपली जबाबदारी दुसऱ्यांवर झटकत असल्याचे चित्र मारेगावात पहायला मिळते.कारवाईत सातत्य नाहीवाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांविरूद्ध सातत्याने कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ उद्दीष्टपूर्तीसाठी कार्यवाहीचे सोपस्कार पार पाडले जाते. त्यामुळे रस्त्यावर प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस एखादेवेळी कार्यवाही करताना दिसतात. त्यावेळी रोडच्या दोनही बाजुला कार्यवाहीच्या भितीने वाहनचालकांच्या रांगा लागलेल्या असतात. नागरिकांनाही जबाबदारीची जाणिव नाही. वाहने वाहतुकीचे नियम सांभाळून चालविल्यास निम्म्या समस्यांचे निराकरण होऊ शकते. परंतु नागरिक मात्र एवढी तसदी घेण्यासही तयार नसल्याचे दिसून येते. पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष आहे.पोलिसांचे आवाहनआपल्या वाहनामुळे अपघात घडेल, असे कृत्य करणे कायद्याने गुन्हा आहे. अल्पवयीन व परवाना नसलेल्या मुलांच्या हातात पालकांनी वाहने देऊ नये, मद्यपान करून वाहने चालवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तालुक्यात अपघात घडल्यास कारणीभूत ठरणाºयाविरूद्ध कडक कारवाई केली जाईल, कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असे ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात