शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वायरमनचा विद्युत खांबावरच अपघाती मृत्यू; संतप्त जमावाची अभियंत्यास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 13:35 IST

काळी दौ. येथे बाजारपेठ कडकडीत बंद

महागाव (यवतमाळ) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या काळी (दौ.) येथील ३३ केव्ही उपकेंद्रात आउटसोर्सिंगमध्ये काम करणारा खासगी वायरमन विठ्ठल सीताराम आढाव (२७) याचा करंट लागून विद्युत खांबावरच गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. आढाव तांत्रिक बिघाड दुरुस्त करीत असताना उपकेंद्रातून हलगर्जीपणे वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

विठ्ठल आढाव याच्या मृत्यूची बातमी कळताच संतप्त जमावाने काळी (दौ.) उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता नीलेश काकडे यांना घेराव घातला व चोप दिला. त्यानंतर शुक्रवारी गावकरी व व्यावसायिकांनी घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला. त्यामुळे दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद होती. आढाव हा काळी दौलत उपकेंद्रात आउटसोर्सिंगमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होता. कृषिपंपाच्या फीडरवरील (एजी फीडर) तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी उपकेंद्रातून वीजपुरवठा बंद करून (ब्रेक डाउन) त्याला दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले.

उपकेंद्रात कनिष्ठ अभियंता नीलेश रामदास काकडे व ऑपरेटर राहुल राऊत होते. वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातील विद्युत खांबावर चढून तांत्रिक बिघाड दुरुस्त करीत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाला. यात विठ्ठल आढाव हा तारांना चिकटला व मृत पावला. काही क्षणांतच मोठा जमाव घटनास्थळी जमा झाला. कनिष्ठ अभियंता काकडे हेसुद्धा घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, अभियंत्याच्या हलगर्जीमुळेच विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला व यात विठ्ठल आढाव याचा हाकनाक बळी गेला, असा आरोप सुनील टेमकर आणि सय्यद इरफान यांनी केला.

शुक्रवारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन काळी (दौ.) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विठ्ठल आढाव याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे.

अभियंता व ऑपरेटरविरोधात गुन्हे दाखल

निष्काळजीपणे विद्युत पुरवठा सुरू केल्यामुळेच विद्युत खांबावर तांत्रिक बिघाड दुरुस्त करणारा खासगी वायरमन विठ्ठल आढाव याचा मृत्यू झाल्याची तक्रार मृताचा भाऊ संतोष आढाव यांनी दिली. त्यानंतर पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात कनिष्ठ अभियंता नीलेश काकडे आणि ऑपरेटर राहुल राऊत यांच्या विरोधात भादंवि ३०४ आणि ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास ठाणेदार आर. के. राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीelectricityवीजYavatmalयवतमाळ