शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षक अभियंत्याला अश्लील शिवीगाळ;कंत्राटदाराविरुद्ध शहर पाेलिसात गुन्हा नोंद 

By सुरेंद्र राऊत | Updated: December 12, 2023 16:49 IST

या प्रकरणी अधीक्षक अभियंता यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुरेंद्र राऊत,यवतमाळ: झरी तालुक्यातील मुकुटबन येथील सिमेंट रस्ता बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात केली जात आहे. हे कंत्राट मिळविण्यासाठी कंत्राटदाराने थेट अधीक्षक अभियंता व कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमक्या देणे सुरू केले. तसेच जाब विचारला असता अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणी अधीक्षक अभियंता यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रवीण उंबरकर (५०) रा. वणी असे आरोपी कंत्राटदाराचे नाव आहे. अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे यांनी तक्रार दिली. त्यावरून कलम ३५३, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा करण्यात आला आहे. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रवीण उंबरकर हे अधीक्षक अभियंत्याच्या कक्षात पोहोचले. तेथे त्यांनी विनापरवानगी जाऊन टेबलावरील फाईल फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांना विरोध केला असता अधीक्षक अभियंत्याला धक्का देत अश्लील भाषेत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर रात्री ९ वाजता पुन्हा मोबाईलवर संपर्क करून धमकाविण्याचा प्रयत्न केला. इतर कंत्राटदार यांच्याकडे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे याला संपवितो, त्याच्या सोलापूर येथील निवासस्थानी १०० वर माणसांना पाठवितो, ती त्याला सोडणार नाही, माझा भाऊ मोठा राजकीय नेता आहे, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रवीण उंबरकर याच्यापासून जीविताला धोका असल्याचेही अधीक्षक अभियंता यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी