शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

३२ हजार विद्यार्थ्यांचे आधार अवैध; संचमान्यता वांध्यात येण्याची भीती

By अविनाश साबापुरे | Updated: May 5, 2023 17:53 IST

Yawatmal News विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाचे व्हॅलिडेशन करण्याची प्रक्रिया सध्या शाळांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यात तब्बल ३२ हजार १७८ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड इनव्हॅलिड असल्याची बाब स्टुडंट पोर्टलवरील आकडेवारीवरून पुढे आली आहे.

अविनाश साबापुरेयवतमाळ : विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाचे व्हॅलिडेशन करण्याची प्रक्रिया सध्या शाळांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यात तब्बल ३२ हजार १७८ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड इनव्हॅलिड असल्याची बाब स्टुडंट पोर्टलवरील आकडेवारीवरून पुढे आली आहे. त्यामुळे संचमान्यतेत अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

सन २०२२-२३ या वर्षाची शिक्षक संचमान्यता शाळेतील विद्यार्थिसंख्येच्या आधारावरच निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड स्टुडंट पोर्टलवर यशस्वीरीत्या अपलोड झाले, तेवढीच विद्यार्थिसंख्या संचमान्यतेसाठी गृहीत धरण्याचा शिक्षण विभागाचा नियम आहे. मात्र यंदा त्यापेक्षा कठोर निर्णय घेण्यात आला. अपलोड झालेले आधारकार्डदेखील यूआयडीएआयकडून (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) पडताळून घेतले जात आहे. या पडताळणीत हजारो विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक इनव्हॅलिड दाखविले जात आहे. तेवढे विद्यार्थी संचमान्यतेसाठी गृहीत धरले जाणार नाहीत. जिल्ह्यात आजघडीला सोळाही तालुक्यांमध्ये इनव्हॅलिड ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३२ हजारांवर आहे. त्यांच्या आधारकार्डमधील शाळेच्या रेकाॅर्डप्रमाणे दुरुस्ती करून पुन्हा स्टुडंट पोर्टलवर अपलोड करणे आणि नंतर त्यांचे व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे आधार व्हॅलिडेशनची वेबसाईट मंदगतीने चालत असल्यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे.

बीआरसी केंद्रात लावणार आधार मशिन

यवतमाळ पंचायत समितीअंतर्गत सर्वच केंद्रांतील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे व्हॅलिडेशन करण्याबाबत धावपळ सुरू आहे. हे काम तातडीने करता यावे, यासाठी पंचायत समितीमधील बीआरसी केंद्रात सोमवार, ८ मेपासून आधार मशिन लावले जाणार आहे. तेथे विद्यार्थ्यांचे आधार अपडेट, मिसमॅच कार्ड, इनव्हॅलिड विद्यार्थी, आदी कामे केली जाणार आहेत. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डStudentविद्यार्थी