शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

वार्डातून गर्भवतीला हाकलले, उघड्यावर झाली प्रसूती; यवतमाळमधील धक्कादायक प्रकार!

By सुरेंद्र राऊत | Updated: October 22, 2022 20:33 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. प्रत्येक जण मौजमजा करीत आहे. गरीब रुग्णांना कुणीच वाली नाही.

यवतमाळ :

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. प्रत्येक जण मौजमजा करीत आहे. गरीब रुग्णांना कुणीच वाली नाही. शुक्रवारी रात्री १० वाजता स्त्रीरोग विभागातील वार्ड क्र. ३ मध्ये दाखल झालेल्या पारधी समाजाच्या महिलेला सकाळी चक्क हाकलून दिले. रात्रभर तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. रुग्णालय परिसरातच उघड्यावर सकाळी ८ वाजता या महिलेची प्रसूती झाली. तिनेच स्वत:च्या बाळाची नाळ तोडली. प्रसूतीनंतर ही महिला पतीसह गावी निघून गेली.

प्रतीक्षा सचिन पवार (२२) रा.बाळेगाव झोंबाडी ता.नेर असे व्यवस्थेची प्रताडणा सहन कराव्या लागणाऱ्या महिलेचे नाव आहे. प्रतीक्षाची दुसरी प्रसूती होती. ती पतीसह शुक्रवारी रात्री १०८ रुग्णवाहिकेने मेडिकलमध्ये पोहोचली. तिला वार्ड क्र. ३ मध्ये दाखल करून घेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रतीक्षाला रक्त देण्याची गरज असल्याचे सांगून तिच्या पतीला खासगी ब्लड बॅंकेतून रक्त पिशवी आणण्यास सांगितले. आर्थिक स्थिती नसतानाही सचिन पवार याने पत्नीसाठी १,६०० रुपये किमतीची रक्ताची बॅग आणली. ही रक्ताची पिशवी घेऊन तो पहाटे ४.३० वाजता स्त्रीरोग विभागात पोहोचला. मात्र, तोपर्यंत तेथील डॉक्टर व नर्सेस यांनी प्रतीक्षाकडे ढुंकूनही पाहिले नाही. रक्ताची पिशवी दिल्यानंतरही रक्त लावण्यात आले नाही. याची विचारणा केली असता, सचिन व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करीत वार्डातून हाकलून देण्यात आले. रक्ताची पिशवीही त्यांच्या अंगावर भिरकावली. पत्नीला घेऊन सचिन शासकीय रुग्णालय परिसरातीलच मैदानात थांबला. चहा-पाणी घेत असतानाच, सकाळी ८.३० वाजता प्रतीक्षाने उघड्यावर गोंडस बाळाला जन्म दिला. उघड्यावर प्रसूती होत असल्याने, परिसरातील नागरिक तिच्या मदतीला धावून आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रतीक्षाच्या वेदनेची कदर केली नाही. डॉक्टर येथे उपचार करणार नाहीत, याची खात्री पटल्याने नवजात बाळासह ओली बाळंतीण पत्नीला घेऊन सचिन आपल्या गावी पोहोचला.

गरीब रुग्णांना दिली जाते हीन वागणूकनिरक्षर असलेल्या सचिन व त्याच्या पत्नीला अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळाली, ही आपबिती त्याने ‘लोकमत’कडे कथन केली. हा प्रकार शासकीय रुग्णालयात नित्याचाच झाला आहे. थातुरमातुर चौकशी करून दोषींना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी एका महिलेला गरज नसताना दुसऱ्याच महिलेचे रक्त लावले, नंतर तिला कोरोना असल्याचे सांगण्यात आले. यातच त्या महिलेचा मृत्यू झाला. ही महिलाही अतिशय मागास संवर्गातील होती.पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील रुग्णांचे हालरुग्णसेवक म्हणवून घेणारे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील गरीब रुग्णांचे हाल होत आहे. प्रतीक्षा पवार हीसुद्धा नेर तालुक्यातील आहे. रुग्णालयातील गैरसुविधांकडे पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. केवळ घोषणा करून चालणार नाही, येथे कणखर प्रशासक आणि रिक्त पदे तत्काळ भरण्याची आवश्यकता आहे, तरच गोरगरीब रुग्णांना न्याय मिळू शकतो. ही सुविधा देऊ शकत नसेल, तर संजय राठोड यांनी रुग्णसेवक हे बिरुद लावू नये, असा सूर रुग्णालय वर्तुळातून ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ