शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; चिमुकल्याच्या डोक्यावरून मायेचा हात गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 18:24 IST

सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल

सावळी सदोबा (यवतमाळ) : पारवा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या माळेगाव येथील एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजता घडली.

प्रीती अमोल राठोड (२४), असे मृत विवाहितेचे नाव आहे. घटनेची माहिती विवाहितेच्या माहेरी कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. माहेरच्या नातेवाइकांनी किंचाळी फोडत मृतदेहाला कोणालाच हात लावू दिला नाही. सासरच्या मंडळींना अगोदर अटक करा, नंतरच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवा, असा नातेवाइकांचा आग्रह होता. लग्न झाल्यापासूनच सासरच्या मंडळीचा माझ्या बहिणीला मानसिक त्रास दिल्याने प्रीतीच्या भावाने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नमूद केले. माझी बहीण प्रीती माहेरी आल्यावर नेहमी सासरच्या लोकांकडून त्रास असल्याचे सांगत होती, असेही नमूद केले.

पारवाचे ठाणेदार गजानन गजभारे व पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रीतीच्या सासरच्या मंडळीविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रीतीने बाळाच्या पाळण्याच्या दोरीने गळफास घेतला. मात्र, सासरच्या मंडळींनी तिचा घातपात केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे माहेरच्यांनी म्हटले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर माळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत प्रीतीला केवळ एक वर्षाचा लहान मुलगा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळDomestic Violenceघरगुती हिंसा