शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास; टिपेश्वर अभयारण्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 22:48 IST

शिकारी सक्रिय असल्याचा संशय

संतोष कुंडकर

वणी (यवतमाळ) : केळापूर तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात गळ्याला फासाचा तार अडकलेला वाघ फिरत आहे. ही बाब पर्यटकांच्या निदर्शनास आल्यानंतर अभयारण्यात शिकारी सक्रिय असल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका वाघिणीसोबतही असा प्रकार घडला होता. अभयारण्यात रानडुक्कर, रोही, सांबर, चितळ, नीलगाय, ससे, मोर यांची संख्याही मोठी आहे. या प्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासात वाघ अडकला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्य व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. येथे पर्यटकांचा राबता मोठा आहे. प्रसारमाध्यमांवरील रील्स, तसेच वाघांच्या मनमोहक अदांच्या फोटोमुळे पर्यटक या अभयारण्याकडे आकर्षित होत आहेत. वाघांची, बछड्यांची भ्रमंती, शिकार इत्यादी अनुभव सफारीदरम्यान पर्यटक घेतात. अशातच अभयारण्यातील कक्ष क्रमांक १११ मध्ये एका पर्यटकास शिकारीच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या फासाची तार वाघाच्या गळ्यात अडकून असल्याचे दिसून आले. दरम्यान, अभयारण्यात प्लास्टिक कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे आणि दंडात्मक कार्यवाहीचीसुद्धा तजवीज आहे; परंतु तरीही काही पर्यटक निष्काळजीपणे प्लास्टिक कचरा, तसेच प्लास्टिकच्या पाणी बॉटल अभयारण्य परिसरात फेकतात. काही दिवसांपूर्वी एक वाघ अशाच रिकाम्या पाणी बॉटलसोबत खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आता वाघाच्या गळ्यात हा फास गळ्यात अडकल्याचे पुढे आले आहे.

वाघ अनेकदा टिपेश्वरच्या बाहेर जातात. एखाद्या शेतात लावलेला फास त्या वाघाच्या गळ्यात अडकला असावा. या वाघाला बेशुद्ध करून त्याच्या गळ्यातील फास काढण्याची परवानगी वरिष्ठांनी दिली आहे. शनिवारी वाघाच्या गळ्यातील फास काढण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.-उत्तम फड, विभागीय वनअधिकारी, वन्यजीव विभाग, पांढरकवडा