शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नीलगायींची शिकार करून जाणाऱ्या टोळीला रंगेहात अटक

By सुरेंद्र राऊत | Updated: April 16, 2023 18:33 IST

काळीदौलत परिसरात शिकार : दोन वाहनासह सातजण लागले हाती

महागाव (यवतमाळ) : पुसद वनविभाग महागाव तालुका वनपरिक्षेत्रातील काळी (दौ.) वर्तुळामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत शिकाऱ्यांच्या टोळीला जेरबंद केले. या टोळीकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये तीन नीलगाई मृतावस्थेत सापडल्या. या टोळीचा म्होरक्या अंजूम दोन साथीदारांसह पसार होण्यात यशस्वी झाला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पुसद विभागातील पथक शनिवारी रात्री गस्तीवर असताना मोहदी ते काळीदौलत रस्त्याने वन्यप्राण्यांची शिकार करून एक टोळी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी पी.एस. राऊत यांना माहिती देत परिसरात नाकाबंदी केली. सापळा रचून काळीदौलत कडे जाणाऱ्या वाहनांना पकडण्यात आले. त्यातील एक वाहन पळून जाण्यात यशस्वी झाले. दोन वाहने पोलिसांच्या हाती लागली. यामध्ये एक स्कार्पिओ (क्र. एम एच २० एजी २००५) व क्वॉलिस (एमएच-२९-एफ-०१६९) ही वाहन आहेत. ज्यामध्ये तीन नीलगाईंची शिकार करून सत्तुराने त्यांचे तुकडे करण्यात आले होते. आरोपी आदिल खान एजाज खान (३०), समीर खान असद खान (२७), शेख शाहरुख शेख उस्मान (२६) तिघे रा. रा. वसंतनगर पुसद, फैय्यद अहेमद मुश्ताक अहेमद (२५) रा. गढीवार्ड पुसद, उस्मान खान कदीर खान (३८) रा. वजीराबाद जि. नांदेड, इम्रान अहमद सुलतान (२३), देगलूर जि. नांदेड, शेख असद शेख युनुस (२०) रा. खडकपुरा जि. नांदेड यांना अटक करण्यात आली.

पोलिस उपनिरिक्षक सागर भारस्कर यांनी नीलगायीची शिकार झाल्याची माहिती वन विभागाला दिली. त्यावरून अशोक सोनकुसरे  उपवनसंरक्षक पुसद यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी यांनी पोलिसांसोबत सापळा रचला.गाडीची झडती घेतली असता गाडी मध्ये मागील बाजूस वन्यप्राणी तीन निलगायी ज्यांचे सहा तुकडे करण्यात आले होते.  गाडीमध्ये ताजे रक्त दिसुन आले. तर स्कार्पिओमध्ये आरोपींसह रक्ताने माखलेले ३ सुरे, एक कोयता हाती लागला.

या प्रकरणात भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक निरीक्षक अमोल सांगळे, उपनिरीक्षक सागर भारस्कर, जमादार तेजाब रणखांब, सुनील पंडागळे, मोहंमद ताज, दिगंबर गिते, वन विभागातील आरएफओ पी.एस. राऊत, कुणाल लिमकर, पी.पी. गंगाखेडे, एस.बी. बदुकले, जी.बी. राठोड, एस.एच. चिरंगे, आर.आर. राठोड, शेख मुकबीर यांनी केली.चौकट.म्होरक्या  अंजूमसह तिघे पसारपुसद परिसरात सतत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असणारा अंजूम खान हा पुन्हा पोलिसांच्या रडारवर आला आहे. वन्यजीवांची शिकार करून त्यांच्या मांसाची तस्करी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अंजूम असल्याचे पुढे आले आहे. मात्र कारवाई दरम्यान अंजूम हा इम्रान व गोपाल या दोन साथीदारासह पसार होण्यात यशस्वी झाला. वन विभाग व पोलिस त्याच्या मागावर आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी