शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अन् दुचाकीचोरटा 'असा' अडकला जाळ्यात, पाच बुलेटसह नऊ दुचाकी जप्त

By विशाल सोनटक्के | Updated: October 21, 2023 18:12 IST

दोन आरोपी ताब्यात : पुसदमधील भोजला फाट्यावर कारवाई

यवतमाळ : विना क्रमांकाची बुलेट विकण्यासाठी एक जण पुसदमधील वाशिम रोड येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खातरजमा करून त्याला पकडण्यासाठी ते जाताच सदर इसम पळू लागला. पथकाने ताब्यात घेवून विचारपूस केली असता तो दुचाकीचोर निघाला. पोलिसांनी त्याच्याकडून पाच बुलेटसह एकूण नऊ मोटारसायकली हस्तगत केल्या. ही कारवाई भोजला फाट्यावर शनिवारी करण्यात आली.

करण रमेश शिंदे (२३, रा. अंबाभवानी नगर, जि. परभणी) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. त्याने विक्रीसाठी आणलेली बुलेट मोटारसायकल शिवाजी शाळा पुसद येथून चोरल्याची कबुली दिली. या मोटारसायकल चोरीप्रकरणी पुसद ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे. अधिक विचारपूस केल्यानंतर या भामट्याने मागील दीड वर्षांत पुसद, दिग्रस, खंडाळा, परभणी व आदिलाबाद (तेलंगाणा) येथून त्याचा साथीदार अनिल सोळंके (२२, रा. महागाव) याच्या मदतीने मोटारसायकली चोरून त्या अवतारसिंग जंगूसिंग जुनी (रा. जनकापूर, ता. नागभिड, जि. चंद्रपूर) यास विक्री केल्याचे सांगितले. पथकाने आरोपी करण शिंदेसह जनकापूर येथे जावून अवतारसिंगला ताब्यात घेतले.

त्याच्याजवळ चोरीच्या आठ मोटारसायकली आढळून आल्या. याप्रकरणी सात लाख ५० हजार रुपये किमतीच्या नऊ मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. यावेळी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पकडलेल्या दोन आरोपींना दिग्रस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अनिल सोळंके याचा पथक शोध घेत आहे. ही कारवाई सपोनि गजानन गजभारे, अमोल सांगळे, पोलिस उपनिरीक्षक रेवन जागृत, पोलिस अंमलदार तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंढोकार, पंकज पातुरकर, बबलू चव्हाण, सुनील पंडागळे, किशोर झेंडेकर, अमित झेंडेकर, अमित कुमरे आदींच्या पथकाने पार पाडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ