शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मृत्यूच्या भयाने पछाडलेले ‘ते’ १९ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 10:07 IST

कोरोनाच्या संकटातून आम्ही सुखरूप बाहेर पडू, याची कोणतीही खात्री नव्हती. मृत्यूच्या भयातील ते १९ दिवस अजूनही अंगावर शहारे आणतात, असा अनुभव चीनमधून परतलेल्या स्रेहल चटकी या विद्यार्थिनीने ‘लोकमत’जवळ कथन केला.

ठळक मुद्देयवतमाळच्या विद्यार्थिनीचा शहारे आणणारा अनुभव कोरोनाच्या संकटातून सुखरूप परतली

संतोष कुंडकर/देवेंद्र पोल्हे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर आम्ही १९ दिवस अक्षरश: बंदिवासात होतो. कोरोनाच्या संकटातून आम्ही सुखरूप बाहेर पडू, याची कोणतीही खात्री नव्हती. मात्र सुदैवाने आम्ही या आजारापासून वाचलो. मात्र मृत्यूच्या भयातील ते १९ दिवस अजूनही अंगावर शहारे आणतात, असा अनुभव चीनमधून चिंचमंडळमध्ये परतलेल्या स्रेहल चटकी या विद्यार्थिनीने ‘लोकमत’जवळ कथन केला.मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ या लहानशा गावातील स्रेहल मोरेश्वर चटकी ही विद्यार्थिनी वुहानपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या हुबई पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे. स्नेहलने सांगितले की, जानेवारी महिन्यात चीनमध्ये अचानक कोरोना या जीवघेण्या आजाराचा उद्रेक झाला. शेकडो लोकांना त्याची बाधा झाली. यामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खोलीच्या बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. २४ तास तोंडाला मास्क लावून ठेवण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या होत्या. भारतीय माध्यम व समाजमाध्यमावर याविषयात अतिशय चुकीची माहिती पसरविण्यात येत होती. भारतात कोरोनाबद्दल जे वातावरण तयार केले जात होते, तसे तेथे काहीही नव्हते. हा आजार पसरू नये, याची काळजी चीन सरकारकडून घेतली जात होती. नागरिकांना या आजाराची बाधा होऊ नये म्हणून त्यांना आवश्यक असलेले सर्व साहित्य खाण्या-पिण्याच्या वस्तू घरपोच दिल्या जात होत्या.कोरोनाच्या रुग्णाला ठार मारताहेत ही अफवाचवुहानमधील कोरोनाच्या संकटातून सुखरुप बाहेर पडलेली स्नेहल चटकी म्हणाली, कोरोनाच्या रूग्णाला गोळ्या घालून ठार मारण्यात येत आहे, अशा बातम्या भारतीय समाजमाध्यमातून पसरविण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात त्या अफवा ठरल्या. कारण तेथील सरकारने असे काहीही केले नाही. उलट सर्वांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली. चीनवरून निघाले तेव्हा माझ्यासोबत महाराष्ट्रातील ३४ विद्यार्थी होते. आम्ही सर्व मिळून ५०० जण होतो. त्यात काही कुटुंबांचाही समावेश होता. यापैकी एकालाही कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्नेहलने सांगितले.विद्यापीठात आम्हाला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, तेथे देखील अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली होती. या काळात मी आईवडिलांच्या संपर्कात होतेच. मला आईवडिलांकडून लवकर परत येण्याचा आग्रह सुरू होता. परंतु खबरदारी म्हणून आम्हाला सोडण्यात येत नव्हते.अखेर आम्ही भारतीय दूतावासाशी संपर्क केला. त्यानंतर काळजीपूर्वक आम्हाला २ फेब्रुवारीला चीनमधून विमानाने दिल्लीत आणण्यात आले. याठिकाणी तब्बल १६ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली आम्ही राहिलो. दिवसभरात अनेकदा आमच्या तपासण्या करण्यात येत होत्या. अखेर १९ फेब्रुवारीला सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आमची दिल्लीतून सुटका करण्यात आली. त्यानंतर मी सुखरुप घरी पोहचले. मांसाहार केल्याने कोरोनाची लागण होते, याची खात्री पटल्यानंतर चीनमध्ये मांसाहार करणे बंद झाले. अंडेही कमी प्रमाणात खायला देण्यात येत असल्याचे तिने सांगितले. वरोरा येथे बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन २०१८ मध्ये स्रेहलने चीनमधील हुबई पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीमध्ये एम.बी.बी.एस.ला प्रवेश घेतला होता. तिचे वडील शेतीसोबतच हार्डवेअरचा व्यवसाय सांभाळतात. आई शालिनी गृहिणी आहे, तर भाऊ नीरज नागपूर येथे शिक्षण घेत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना