शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘मजीप्रा’चे 8500 कर्मचारी दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 06:24 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा (मजीप्रा)तील कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार वेतन, विभागीय चौकशी, दंड, वार्षिक वेतनवाढ दिली जाते. मात्र २४ वर्षांनंतरची दुसरी कालबद्ध पदोन्नती देण्यासाठी नियम गुंडाळून ठेवण्यात आले आहेत.

यवतमाळ - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा (मजीप्रा)तील कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार वेतन, विभागीय चौकशी, दंड, वार्षिक वेतनवाढ दिली जाते. मात्र २४ वर्षांनंतरची दुसरी कालबद्ध पदोन्नती देण्यासाठी नियम गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. ही पदोन्नती लागू झाली नसल्याने या विभागातील ८५०० कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सेवाशर्ती जशाच्या तशा लागू राहतील, अशी तरतूद १९७६ च्या कायद्यात करण्यात आली आहे. ११ नोव्हेंबर १९७६ च्या राजपत्रात तशी नोंदही घेण्यात आली आहे. मात्र, लाभ देताना हा कायदा गुंडाळून ठेवला जातो. कारवाई, दंड करताना या कायद्याचा आधार घेतला जातो. तथापि, सहाव्या वेतन आयोगाची दुसरी कालबद्ध पदोन्नती देण्यासाठी या कायद्याचा विसर पडतो.दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशाने जानेवारी २०२० मध्ये शासनाने २०० कोटी रुपये मजीप्राला दिले. तरीही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक लाभांना मुकावे लागत आहे. कुटुंब निवृत्तिवेतन, रजा रोखीकरण, अंशदान, उपदान, निवृत्तिवेतन कमी मिळणे, आदी नुकसान टाळण्यासाठी १ मार्च २०१० च्या शासन निर्णयानुसार दुसरी कालबद्ध पदोन्नती मिळावी, यासाठी कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे.सेवाप्रवेश नियमही उसना घेतलेला‘मजीप्रा’ला स्थापनेपासूनच स्वतंत्र सेवाप्रवेश नियम नाही. पाटबंधारे विभागाचा सेवाप्रवेश नियम वापरला जात आहे. उसनी घेतलेली ही नियमावलीसुद्धा पूर्णपणे अमलात आणली जात नाही. दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीतही नेमके हेच होत आहे. पाटबंधारे आणि मजीप्रा कर्मचाऱ्यांच्या वेतनात, सेवानिवृत्तिवेतनात बरीच तफावत आहे. मजीप्रा कर्मचाऱ्यांची कुठलीही मागणी कायद्याच्या चौकटीत राहूनच आहे. दुसरी कालबद्ध पदोन्नती त्याच स्वरूपाची आहे, तरीही सरकार देण्यास तयार नाही. आता न्यायालयाचे दार ठोठावल्याशिवाय पर्याय नाही.- राजाराम विठाळकर, सरचिटणीस, मजीप्रा कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी संघटना

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारYavatmalयवतमाळ